ख्रिस्ती कुकी आतंकवादी प्रतिदिन हिंदु मैतेई समुदायावर करत आहेत गोळीबार !
|
इंफाळ (मणीपूर) – ख्रिस्ती कुकी आतंकवादी आणि हिंदु मैतेई यांच्यात ३ मासांपासून चालू असलेला संघर्ष अल्प होतांना दिसत नाही. गावांचे कथित रक्षक असलेले कुकी आतंकवादी हे मैतेई गावकर्यांवर गोळीबार करत आहेत. हे प्रामुख्याने राजधानी इंफाळच्या जवळपासच्या भागात आणि डोंगरांच्या पायथ्याशी होत असल्याची माहिती ‘मैतेई हेरिटेज सोसायटी’ या संघटनेने ट्वीट करून दिली. असले प्रकार ३ मे २०२३ पासून सातत्याने होत असल्याचेही सांगण्यात आले आहे.
❗Please see this video to understand how and where the Manipur violence started. All events are beautifully captured by video and other evidences. It also tells the goals of the Chin Kuki Zo militants and their demand for creating their own homeland.#KashmiriPandits1990… https://t.co/Vc6EvQ2ekR
— Meitei Heritage Society (@meiteiheritage) August 1, 2023
१. अशातच एका घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला असून त्यामध्ये एक पत्रकार एका मैतेई महिलेची मुलाखत घेत असतांनाच त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. सुदैवाने दोघेही त्यातून बचावले.
२. दुसरीकडे भारत-म्यानमार सीमेवर असलेल्या मोरेह या गावात मणीपूर पोलिसांचे १०० कमांडो अडकले असून ते पूर्ण शक्तीनिशी सीमेवर पहारा देत आहेत. त्यांना आवश्यक अन्न आणि पाणी यांची न्यूनता भासत आहे. तरीही म्यानमारमधील आतंकवादी आणि अवैध प्रवासी यांच्यापासून मणीपूरला वाचवण्यासाठी ते भिंतीप्रमाणे उभे आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे. मणीपूर सरकार या कमांडोजना साहाय्य करण्यासाठी प्रयत्नशील असतांना कुकी महिला यामध्ये आडकाठी निर्माण करत आहेत.
३. केंद्रीय सुरक्षा दलांच्या संदिग्ध भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केला जात असून केंद्रीय गृहमंत्र्यांचा आदेश असतांनाही त्यांनी म्यानमारमधून ७१८ घुसखोरांना मणीपूरमध्ये प्रवेश दिल्याचे सांगितले जात आहे.
४. सरकारी आकडेवारीनुसार कुकी समाजाच्या तुलनेत मैतेई समाजाला मोठ्या प्रमाणात विस्थापित व्हावे लागले आहे. कुकींच्या तुलनेत मैतेईंची पाचपट अधिक कुटुंबे स्थलांतरित झाली आहेत. सरकारी आकडेवारी सांगते की, गेल्या ८ वर्षांत २८० मैतेई कुटुंबांना त्यांचे घर सोडावे लागले. या तुलनेत केवळ ५९ कुकी कुटुंबे विस्थापित झाली.
५. कुकी आतंकवाद्यांकडून केल्या जात असलेल्या हिंसाचारास कुकी समुदाय समर्थन देतो. त्याचे म्हणणे आहे की, मणीपूर सरकार त्यांना लक्ष्य करत असल्याने ते त्याचा प्रतिकार करीत आहेत.
संपादकीय भूमिकामणीपूर येथील हिंसाचारामागे कुकी आतंकवादी, अमली पदार्थांची तस्करी करणारे आतंकवादी आणि म्यानमारमधून फूस लावणार्या शक्ती आहेत. हे लक्षात घेऊन आता भारताने अशांवर कठोर कारवाई करण्याची नितांत आवश्यकता आहे ! |