धर्मध्वज पूजनाच्या वेळी साधकाला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूूती
१. धर्मध्वजाचे पूजन होण्याआधी मला हनुमंताचे दर्शन झाले. मला आकाशात पांढरे ढग श्रीविष्णूचे वाहन गरुड यांच्या रूपात दिसले.
२. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ धर्मध्वज पूजनाच्या सोहळ्याच्या ठिकाणी आल्यानंतर मला देवतांची सूक्ष्मातून उपस्थिती जाणवत होती.
३. ‘ध्वजारोहण देवलोकात होत आहे’, असे मला जाणवत होते.
४. ‘देवलोकातून श्रीविष्णु, श्रीराम, शिव-पार्वती आणि परात्पर गुरु (डॉ.) आठवले धर्मध्वजावर पुष्पवृष्टी करत आहेत. ते सर्व साधकांना आशीर्वाद देत आहेत’, असे मला दिसत होते.
५. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी ध्वजारोहण केल्यावर ३ वेळा ध्वज फडकला. तेव्हा ‘सर्व लोकांत क्षात्रतेज आणि ब्राह्मतेज प्रचंड प्रमाणात प्रक्षेपित होत आहे’, असे मला जाणवले.
६. आम्ही जयघोष करत असतांना ‘आम्ही हनुमंताची वानरसेना आहोत’, असे वाटून माझी भावजागृती झाली. ‘हनुमंताप्रमाणे दास्यभक्तीने गुरुसेवा करण्यासाठी साधकांचा जन्म झाला आहे’, असे मला वाटत होते.
मला धर्मध्वजपूजन सोहळा पहाण्याची संधी मिळाल्याबद्दल गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– श्री. अरुण गौडा, बेंगळुरू, कर्नाटक. (१४.६.२०२३)
|