‘वन्दे मातरम्’ म्हणण्यास विरोध करणारे आमदार अबू आझमी यांचे सदस्यत्व त्वरित रहित करा !
कागल उद्धव ठाकरे गटाच्या वतीने निवेदन
कागल (जिल्हा कोल्हापूर) – महाराष्ट्रातील समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी विधानसभेत ‘आम्ही ‘वन्दे मातरम्’ म्हणणार नाही’, असे वक्तव्य करून भारताच्या राष्ट्रीय गीताचा घोर अवमान केला आहे. तरी ‘वन्दे मातरम्’ म्हणण्यास विरोध करणारे आमदार अबू आझमी यांचे सदस्यत्व त्वरित रहित करावे, या मागणीचे निवेदन उद्धव ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजीराव भोकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत कागल तहसीलदार इंगळे यांना देण्यात आले.
या प्रसंगी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. विजय आरेकर, बजरंग बलाचे श्री. विनायक आवळे, दीपक भोपळे, उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते सर्वश्री राजेंद्र साळोखे, लक्ष्मण लाड, मधुकर भोसले, दिग्विजय पाटील, विकास चव्हाण यांसह अन्य उपस्थित होते.