सद़्‍गुुरु सत्‍यवान कदम यांच्‍या संदर्भात पडेल, सिंधुदुर्ग येथील साधकांना आलेल्‍या अनुभूती

‘१९ ते २१.४.२०२३ या कालावधीत सनातन संस्‍थेचे सद़्‍गुरु सत्‍यवान कदम यांचे पडेल, सिंधुदुर्ग येथे येण्‍याचे नियोजन असल्‍याने सर्व साधकांमध्‍ये उत्‍साहाचे वातावरण होते. या वेळी साधक आणि धर्मप्रेमी अशा सर्वांना सद़्‍गुरु सत्‍यवानदादा यांच्‍या चैतन्‍याचा लाभ होईल, असे नियोजन करण्‍यात आले होते. त्‍या वेळी साधकांना आलेल्‍या अनुभूती येथे दिल्‍या आहेत.

सद़्‍गुरु सत्‍यवान कदम

१. ‘सद़्‍गुरु सत्‍यवान कदम यांनी, म्‍हणजे प्रत्‍यक्ष परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांनीच गृहप्रवेश केला’, असे वाटून आनंद होणे

श्री. अमित जठार यांनी पडेल, सिंधुदुर्ग येथे एक सदनिका घेतली आहे. अक्षय्‍य तृतीया, म्‍हणजे २२.४.२०२३ या दिवशी त्‍या सदनिकेमध्‍ये श्री गणेशपूजन करायचे ठरले होते; पण २१.४.२०२३ या दिवशी सद़्‍गुरु सत्‍यवानदादा त्‍या भागात येणार होते. ‘ते श्री. अमित जठार यांच्‍या घरी येणार आहेत’, हे ऐकून श्री. अमित यांना ‘प्रत्‍यक्ष परात्‍पर गुरु डॉ. आठवलेच आपल्‍या घरी येत आहेत’, असे वाटून आनंद झाला.

आधुनिक वैद्य रविकांत नारकर

नंतर श्री. अमित यांनी मला भ्रमणभाष केला आणि मला म्‍हणाले, ‘‘माझ्‍या सदनिकेचा गृहप्रवेश प्रत्‍यक्ष गुरुदेवांनी आजच केला आहे. हे माझे भाग्‍य आहे. उद्याचे ‘श्री गणेशपूजन’ हा स्‍थुलातील विधी असून तो लौकिकासाठी करू.’’ त्‍यांचे बोलणे ऐकतांना माझ्‍या अंगावर रोमांच उभे राहिले आणि परात्‍पर गुरु डॉक्‍टर यांच्‍याप्रति कृतज्ञता व्‍यक्‍त झाली.

२. सद़्‍गुरु सत्‍यवानदादा श्री. अमित जठार यांच्‍या सदनिकेत फिरत असतांना सुगंधाची अनुभूती येत होती.

३. सद़्‍गुरु सत्‍यवानदादा यांच्‍या संपर्काच्‍या वेळी अल्‍प ऐकू येणार्‍या साधकाला त्‍यांचे बोलणे स्‍पष्‍ट ऐकू येणे

सद़्‍गुरु सत्‍यवानदादा यांचे श्री. बबन गोविंद नारकर यांच्‍या घरी संपर्कासाठी जाण्‍याचे नियोजन केले होते. श्री. बबन नारकर यांना अल्‍प ऐकू येतेे; मात्र प्रत्‍यक्षात सद़्‍गुरु सत्‍यवानदादा त्‍यांच्‍या घरी गेल्‍यावर संभाषणाच्‍या वेळी ‘त्‍यांना अल्‍प ऐकायला येते’, असे कुठेही जाणवले नाही. ‘सद़्‍गुरु सत्‍यवानदादा यांच्‍या अर्ध्‍या घंट्याच्‍या सत्‍संगाने त्‍यांचा चेहरा उजळला आहे’, असे मला जाणवले.

४. मुक्‍या प्राण्‍यांनाही सद़्‍गुरु सत्‍यवानदादा यांचे चैतन्‍य हवेसे वाटणे

आम्‍ही दुपारच्‍या भोजनासाठी श्री. लहू दळवी यांच्‍या घरी गेलो होतो. तेव्‍हा ६० टक्‍के आध्‍यात्मिक पातळीच्‍या सौ. वैजयंती लहू दळवी आणि श्री. लहू दळवी यांच्‍याशी सद़्‍गुरु सत्‍यवानदादा यांचे साधनेच्‍या संदर्भात बोलणे झाले. त्‍यानंतर भोजन घेऊन आम्‍ही तेथून निघत असतांना मी श्री. लहू दळवी यांना म्‍हणालो, ‘‘तुमचा कुत्रा कुठे दिसत नाही.’’ तेव्‍हा ते म्‍हणाले, ‘‘तो २ – ३ दिवस आजारी आहे. कुठे फिरत नाही आणि काही खात नाही.’’ त्‍यानंतर श्री. दळवी कुत्र्याला उद्देशून म्‍हणाले, ‘‘सद़्‍गुरु दादा आले आहेत. बाहेर तरी ये.’’ त्‍या क्षणी कुत्रा अडगळीच्‍या जागेतून व्‍यवस्‍थित चालत बाहेर आला आणि आमच्‍या समोर उभा राहिला. यावरून ‘गुरुदेव मुक्‍या जनावरांनाही सूक्ष्मातून चैतन्‍य पुरवून शक्‍ती देतात’, हे मला अनुभवता आले.

परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांनी वरील अनुभूती दिल्‍या. त्‍यामुळे परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या निर्मळ मनात नित्‍य वास करणार्‍या सद़्‍गुरु सत्‍यवानदादा यांच्‍याप्रति आमची श्रद्धा दृढ झाली आणि आम्‍हाला सेवेतील आनंदही मिळाला. यासाठी परात्‍पर गुरु डॉक्‍टर यांच्‍या चरणी कोटीशः कृतज्ञता व्‍यक्‍त करतो.’

– डॉ. रविकांत गोविंद नारकर (वय ६६ वर्षे), पडेल, ता. देवगड, जिल्‍हा सिंधुदुर्ग. (३०.४.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक