‘वन्दे भारत एक्सप्रेस’ला चिपळूण येथे थांबा हवा !

आमदार शेखर निकम यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांकडे केली निवेदनाद्वारे मागणी

चिपळूण – ‘मुंबई – मडगाव’ या ‘वन्दे भारत एक्सप्रेस’ला चिपळूण येथे थांबा मिळावा, अशी मागणी एका निवेदनाद्वारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शेखर निकम यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, देहली यांच्याकडे केली आहे.

या निवेदनात म्हटले आहे की,

१. मुंबई मडगाव- वन्दे भारत एक्सप्रेस चालू केल्याबद्दल आम्ही रेल्वे मंत्री आणि कोकण रेल्वे यांचे अभिनंदन करतो. तसेच याविषयी नमूद करतांना आम्ही खेदाने सांगतो की, वन्दे भारत एक्सप्रेस’ला रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण स्थानकावर थांबा नाही.

२. चिपळूण हे सर्वाधिक लोकसंख्येचे शहर आहे आणि रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख व्यवसाय केंद्र, महामार्गानजीक उच्च दर्जाचे शैक्षणिक केंद्र (एज्युकेशन हब), उद्योग आणि पर्यटन स्थळांनी जोडलेले आहे.

३. रेल्वेत पाणी भरणे आणि अन्य सुविधा चिपळूण स्थानकावर उपलब्ध आहेत.

४. चिपळूण रेल्वेस्थानकाचा महसूल लोकसंख्येनुसार अधिक असेल. अंतराचे निकष क्षम्य केले जाऊ शकतात किंवा शिथिल केले जाऊ शकतात.

५. आपण अन्य राज्यांमध्ये पाहिले आहे की, वन्दे भारत एक्सप्रेस १०० कि.मी. अंतरामध्ये थांबते. तरी या सर्व गोष्टी विचारात घेऊन मुंबई-मडगाव या वन्दे भारत एक्सप्रेसला चिपळूण रेल्वे स्थानकावर थांबा मिळावा.