मणीपूरमधील हिंसाचारावरून संसदेत सलग ८ व्या दिवशीही गदारोळ !
कामकाज काही वेळासाठी स्थगित !
नवी देहली – संसदेच्या पावसाळी अधिवेशनातील सलग ८ व्या दिवशीही विरोधी पक्षांनी मणीपूर येथील हिंसाचारावरून गदारोळ केल्याने लोकसभेचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत, तर राज्यसभेचे कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले.
सौजन्य: Zee News
राज्यसभेत मणीपूरचे सूत्र उपस्थित करण्यात आल्यावर भाजपचे सभागृह नेते आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल म्हणाले की, आम्ही आजच यावर चर्चा करण्यास सिद्ध आहोत; मात्र विरोधक चर्चेपासून पळ काढत आहेत.
संपादकीय भूमिकासातत्याने संसदेत गदारोळ केला जात असल्याने कामकाज होत नसेल आणि गदारोळ करणार्यांवर कठोर कारवाई होत नसेल, तर संसद चालू ठेवायची का ?, याचाच आता विचार करण्याची वेळ आली आहे ! |