नकली आवाजाद्वारे ‘ऑनलाईन’ फसवणूक होत असल्याचे उघड !
नवी देहली – भ्रमणभाषवरून कुणाचाही आवाज चोरून त्याचा वापर पैसे उकळण्यासाठी केला जात असल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. या प्रकाराला ‘आवाज चोरून फसवणूक’ (व्हॉईस क्लोनिंग फ्रॉड) असे म्हटले जाते.
यामध्ये चोरटे (ठग) कृत्रिम बुद्धीमत्तेच्या (‘आर्टिफिशल इंटलिजन्स’च्या) साहाय्याने भ्रमणभाषवरून कुणाचाही आवाज, बोलण्याची पद्धत सर्व हुबेहुब चोरतात (‘कॉपी’ करतात.) यानंतर ठग ज्याचा आवाज चोरला आहे, त्याचे कुटुंबीय, नातेवाईक, मित्र यांना भ्रमणभाषवरून आपल्याच आवाजात संपर्क करतात. हुबेहुब आपल्याच आवाजात ते त्याच्या कुटुंबियांना ‘तो संकटात सापडलो आहे’, असे सांगून भ्रमणभाष नादुरुस्त झाला आहे आणि पैशांची तातडीने आवश्यकता असल्याचे सांगतात. कुटुंबीय, नावेवाईक आदी कुणालाही हा आवाज खोटा असल्याची शंका येत नाही. त्यांचीच व्यक्ती बोलत आहे, असे त्यांना वाटते. यानंतर ठग त्यांना एक ‘बार कोड’ पाठवून त्यावर पैसे पाठवण्यास सांगतात. काळजीपोटी नातेवाईक लगेचच पैसे पाठवतात आणि अशा प्रकारे त्यांची फसवणूक होते.
फ्रॉड का नया तरीका! पहले #AI से आवाज की कॉपी और फिर एक फोन कॉल..अपनों के नाम पर ऐसे लोगों को लूट रहे साइबर अपराधी #CyberCrime #CyberAttack https://t.co/hzqDFHqwNC
— Times Now Navbharat (@TNNavbharat) July 29, 2023
या नकली आवाजात हे ठग संबंधितांचे ‘डेबिट’ आणि ‘क्रेडिट कार्ड’ यांची माहिती मिळवतात आणि संबंधितांच्या खात्यातून पैसे काढून घेतात. यासाठी सावधानता बाळगण्याचे आवाहन सामाजिक माध्यमांवर केले जात आहे. अशा प्रकारचा भ्रमणभाष आला, तर तो बंद करून पीडित व्यक्तीच्या भ्रमणभाषवर संपर्क करून सत्यता पडताळून बघण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.