झारखंडमध्ये धर्मांतराला बळी पडलेल्या २० हिंदूंचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
रांची (झारखंड) – झारखंडमधील गुमला जिल्ह्यात धर्मांतराला बळी पडलेल्या हिंदु समाजातील २० लोकांनी ‘घरवापसी’ (हिंदु धर्मात पुनर्प्रवेश) केली आहे. २८ जुलै २०२३ या दिवशी त्यांनी विधीपूर्वक पूजा-अर्चा करून हिंदु धर्मात प्रवेश केला.
‘ईसाई बन जाओ… बीमारी ठीक हो जाएगी’: लालच और धोखे से करवाया था धर्मांतरण, 2 साल बाद 20 जनजातीय लोगों ने की घर वापसी#Gharwapsi #ConversionMafiahttps://t.co/I9OZBxTmkc
— ऑपइंडिया (@OpIndia_in) July 30, 2023
दोन वर्षांपूर्वी ख्रिस्ती मिशनर्यांनी आजार बरा करण्याचे आमीष दाखवून गावात रहाणार्या २० हिंदूंचे धर्मांतर केले होते. झारखंडमधील हिंदु जनजागरण मंचच्या पुढाकाराने ‘घरवापसी’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गावातील बुद्धेश्वर पहाण यांनी धर्मांतरितांना हिंदु धर्मात पुनर्प्रवेश दिला.
संपादकीय भूमिकाहिंदूंचे धर्मांतर रोखण्यासाठी त्यांना धर्मशिक्षण देणे, हाच प्रभावी उपाय आहे, हे जाणा ! |