#Exclusive : (म्हणे) ‘दिवाळीत फोडण्यात येणारे फटाके, ही पर्यावरणाची सर्वांत गंभीर समस्या !’ – महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ

मशिदींवरील भोंग्यांच्या ध्वनीप्रदूषणाकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाचा कानाडोळा !

मुंबई, ३० जुलै (वार्ता.) – मशिदींवरील भोंग्यांमुळे त्रास होत असल्याच्या अनेक तक्रारी मुंबईतील विविध पोलीस ठाण्यांत प्रविष्ट करण्यात आल्या आहेत. या तक्रारींकडे पोलीस दुर्लक्ष करत असल्यामुळे याविरोधात मुंबई उच्च न्यायालय आणि सत्र न्यायालय येथे खटलेही चालू आहेत. असे असतांना पोलिसांसह महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने मशिदींवरील भोंग्यांच्या ध्वनीप्रदूषणाकडे दुर्लक्ष करून ‘दिवाळीच्या कालावधीत फोडण्यात येणारे फटाके, ही महाराष्ट्रातील पर्यावरणाची सर्वांत गंभीर समस्या आहे’, असे म्हटले आहे. महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या वर्ष २०२१-२२ च्या वार्षिक अहवालात हे नमूद करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचा हाच तो वर्ष २०२१-२२ चा हिंदुद्वेषी वार्षिक अहवाल !

(चित्रावर क्लिक करा)

१. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने २१ आणि २२ फेब्रुवारी २०२१ या दिवशी महाराष्ट्रातील एकूण २७ महानगरपालिकांच्या निवासी, व्यावसायिक आणि शांतता क्षेत्रांत एकूण १०४ ठिकाणी सलग २४ घंटे ध्वनीपरीक्षण केले. त्याच्या नोंदी या अहवालात देण्यात आल्या आहेत.

२. मुंबईत रस्त्यावरील रहदारी आणि पाऊस यांमुळे, तर नवी मुंबईमध्ये गर्दी अन् गाडीचे ‘हॉर्न’ यांमुळे ध्वनीप्रदूषण होत असल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाने म्हटले आहे.

३. २८ ऑगस्ट २०२० या दिवशी गणेशोत्सवाच्या कालावधीत ध्वनीची पातळी वाढल्याचे आवर्जून सांगण्यात आले आहे; मात्र २७ महानगरपालिकांच्या क्षेत्रातील एकाही मशिदींवरील भोंग्यांमुळे ध्वनीप्रदूषण झाल्याचे नमूद करण्यात आलेले नाही.

४. विशेष म्हणजे मुंबई आणि नवी मुंबई या शहरांमधील ध्वनीप्रदूषणाविषयीचे खटले सध्या न्यायालयात चालू आहेत अन् न्यायालयाने स्वत: मशिदींवरील भोंग्यांवरून होत असलेले ध्वनीप्रदूषण मान्य करून त्यावर कारवाई करण्याचा आदेश पोलिसांना दिला आहे; मात्र महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वार्षिक अहवालामध्ये त्याचा साधा उल्लेखही नाही.


राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी नागरिक खालील संपर्कांवर वैध मार्गाने निषेध नोंदवत आहेत –

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ

०२२-२४०१०४३७
०२२-२४०२०७८१
(०२२) २४०१०४३७/२४०२०७८१
E mail : chairman@mpcb.gov.in

________________________________________

पर्यावरण विभाग, महाराष्ट्र शासन (मंत्रालय)

(०२२) २२८७३८४५/२२८२५९७३
E mail : mah-env@nic.in

‘राष्ट्रद्रोही आणि हिंदुद्रोही घटनांचा संयत मार्गाने निषेध करा !’

धर्मविरोधकांचा निषेध करण्यामागचा मुख्य उद्देश त्यांचे वैचारिक परिवर्तन करणे, हा आहे. त्यामुळे कुणाचाही निषेध करतांना तात्त्विक सूत्रांच्या आधारे वैचारिक स्तरावर करा ! चुकणाऱ्या व्यक्तीला/संघटनेला तिच्या चुका सांगून योग्य मार्गावर आणणे, हा व्यापक दृष्टीकोन निषेध व्यक्त करण्यामागे हवा !

संपादकीय भूमिका

केवळ हिंदूंच्या सणांच्या वेळी ध्वनीप्रदूषण मोजणे आणि मशिदींवरून नियमित वाजणार्‍या भोंग्यांकडे दुर्लक्ष करणे, हा उघड पक्षपातीपणा आहे. सरकारने संबंधितांवर कठोर कारवाई करायला हवी !