यवतमाळ येथे महामार्गावर भीषण अपघात !
पोलीस कर्मचारी आणि ट्रकचालक यांचा मृत्यू
यवतमाळ – नागपूर – तुळजापूर राष्ट्रीय मार्गावर वाहनांची तपासणी करणार्या महामार्ग पोलिसांच्या वाहनाला आयशर ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात एक पोलीस कर्मचारी संजय रंगराव नेटके (वय ३० वर्षे) आणि ट्रकचालक यांचा मृत्यू झाला आहे. दोन पोलीस कर्मचारी गंभीर घायाळ झाले असून त्यांच्यावर यवतमाळ येथे उपचार चालू आहेत. २९ जुलैच्या मध्यरात्री हा भीषण अपघात झाला.
#यवतमाळ: भरधाव ट्रकची पोलीस मदत केंद्राच्या वाहनाला धडक; पोलिसासह दोन ठार, दोन कर्मचारी गंभीर
वाहतूक पोलीस संजय रंगराव नेटके (३०) रा. शिवाजी वॉर्ड, #पुसद यांचा आणि आयशर चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत.https://t.co/C3XaptqbOQ
— यवतमाळ (@MazeGaon) July 30, 2023