कर्नाटकमध्ये महिलांना बस प्रवास निःशुल्क झाल्यामुळे मंदिरांच्या उत्पन्नात वाढ !
बेंगळुरू (कर्नाटक) – राज्यातील धर्मादाय विभागाच्या अंतर्गत येणार्या मंदिरांच्या अर्पणामध्ये गेल्या २ मासांत मोठी वाढ झाली आहे. राज्यात महिलांना सरकारी बसप्रवास निःशुल्क झाल्यापासून मंदिरांना भेट देणार्या भाविकांच्या संख्येत वाढ झाली आहे. आतापर्यंत राज्यातील ५८ मंदिरांतील दानपेटींमध्ये २५ कोटी रुपये जमा झाले आहेत. गेल्या वर्षी ही रक्कम १९ कोटी रुपये होती. (हे वाढलेले उत्पन्न सरकार कशासाठी वापरणार आहे ?, हे त्यांनी लोकांना सांगावे ! – संपादक)