गोव्यातील जंगलांत ५ वाघांचा अधिवास
वर्ष २०२२च्या व्याघ्रगणनेच्या अहवालातून उघड
पणजी, ३० जुलै (वार्ता.) – गोवा सरकारने काही दिवसांपूर्वी गोव्यातील जंगलात वाघांचा अधिवास नसल्याचे सांगितले आहे; मात्र राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने २९ जुलै या दिवशी (राष्ट्रीय व्याघ्रदिनाच्या निमित्ताने) प्रसिद्ध केलेल्या वर्ष २०२२च्या व्याघ्रगणना अहवालानुसार गोव्यात ५ वाघांचा अधिवास असल्याचे म्हटले आहे. गोव्यात मागील व्याघ्रगणनेच्या तुलनेत या वेळी २ वाघांची भर पडली आहे. विशेष म्हणजे गोव्यातील म्हादई अभयारण्याला ‘व्याघ्र प्रकल्प’ म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव राज्य वन्य जीव मंडळाने फेटाळणे आणि उच्च न्यायालयाने ३ मासांच्या आत व्याघ्र प्रकल्प घोषित करण्याविषयी आदेश देणे या वादाच्या पार्श्वभूमीवर वर्ष २०२२च्या व्याघ्रगणनेचा अहवाल प्रसिद्ध झाला आहे.
वर्ष २०२२च्या व्याघ्रगणनेच्या अहवालानुसार देशात ३ सहस्र ६८२ वाघ असल्याचे म्हटले आहे आणि यामध्ये मध्यप्रदेशमध्ये सर्वाधिक ७८५, कर्नाटकमध्ये ५६३, महाराष्ट्रात ४४४, अरुणाचल प्रदेशमध्ये ९, गोव्यात ५ आणि झारखंडमध्ये एका वाघाचा समावेश आहे. नागालँड आणि मिझोराम येथे एकही वाघ नाही.
Tiger Reserve: पंतप्रधानांनी म्हादई अभयारण्याबाबत केलीय ‘ही’ घोषणा, गोव्यातील वाघांची संख्याही केली जाहीर https://t.co/znFsRHUy1s#Goa #Tiger #DainikGomantak
— Dainik Gomantak TV (@GomantakDainik) July 30, 2023
♦ ‘म्हादई जलवाटप तंटा’ या संदर्भातील आजपर्यंतच्या घडामोडी पाहण्यासाठी क्लिक करा ♦
हे वाचा –
♦ ३ मासांत म्हादई अभयारण्य व्याघ्रक्षेत्र म्हणून अधिसूचित करा !
https://sanatanprabhat.org/marathi/704740.html