नाशिक येथे पालिका घेणार पीओपीच्या श्री गणेशमूर्ती विक्री न करण्याविषयीचे हमीपत्र !
गोदावरीचे प्रदूषण टाळण्यासाठी आयुक्तांचा निर्णय !
नाशिक – गोदावरी नदीचे प्रदूषण टाळण्यासाठी उच्च न्यायालयाने महापालिका क्षेत्रात पीओपीच्या मूर्तींची विक्री आणि साठा करण्यास बंदी घातली आहे. या पार्श्वभूमीवर आयुक्त तथा प्रशासक अशोक करंजकर यांनी ‘नियम डावलून पीओपीच्या मूर्तींची साठवणूक आणि विक्री केल्याचे आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करावी’, असा आदेशच दिला आहे, तसेच ‘शहरात श्री गणेशमूर्ती विक्रेते आणि साठा करणार्यांनाही पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे महत्त्व पटवून द्यावे’, असे आवाहन करंजकर यांनी केले आहे. गेल्या वर्षी २४९ ठिकाणी शाडू मातीच्या श्री गणेशमूर्ती विक्रीचे कक्ष उभारण्यात आले होते. ‘यंदाही याविषयी मोठ्या प्रमाणात जनजागृती करू’, असेही त्यांनी सांगितले.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, देहली यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पीओपीच्या मूर्तींची विक्री आणि त्या आयात करण्याच्या साठ्यास बंदी घातली आहे. या संदर्भातील कारवाईचा आकडा अल्प असल्यामुळे करंजकर यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बैठक घेतली.
१९ सप्टेंबरपासून गणेशोत्सवास प्रारंभ होत असून या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे महत्त्व पटवून देण्यासाठी जागृती करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.
संपादकीय भूमिका
|