३१ जुलै २०२३ या दिवशी सरदार उधमसिंह यांचा बलीदानदिन आहे. त्या निमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन !
‘जालियनवाला बाग हत्याकांड वर्ष १९१९ मध्ये झाले. जनरल ओडवायर याच्या आज्ञेवरून जनरल डायरने निरपराध लोकांना अरूंद जागेत कोंडून अनुमाने २ सहस्र लोकांना गोळ्या घालून मारले. गोळ्या संपल्यावरच हेे हत्याकांड थांबले. कित्येक जण धक्काबुक्कीत मेले. गोळीबाराची आज्ञा देणारा जनरल ओडवायर याचा १३ मे १९४० या दिवशी इंग्लंड येथे सत्कार होत असतांना एक भारतीय युवक उधमसिंह यांनी त्याचा वध केला.’
– प्राचार्य वैद्य दिलीप डबीर, राष्ट्रीय कीर्तनरत्न.