आतंकवादविरोधी पथकाच्या आरोपपत्रात डी.आर्.डी.ओ.च्या संचालकांवर ठपका
डॉ. कुरुलकर यांनी पाकिस्तानला भारतीय क्षेपणास्त्रांची माहिती दिली !
पुणे – संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (डी.आर्.डी.ओ.चे) संचालक आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर यांनी ‘ब्रह्मोस’सह ‘अग्नी’ आणि ‘रुस्तुम’ या क्षेपणास्त्रांची माहिती पाकिस्तानच्या महिला गुप्तहेराला दिली होती, असे आतंकवादविरोधी पथकाने (ए.टी.एस्.ने) प्रविष्ट केलेल्या दोषारोपपत्रात म्हटले आहे. या महिला गुप्तहेराने तिचे नाव ‘झारा दासगुप्ता’ असल्याचे सांगितले होते. झारा आणि डॉ. कुरुलकर यांचे ‘व्हॉट्सअॅप’वरील संभाषणावरून ही माहिती उघड झाली. ए.टी.एस्.ने कुरुलकर यांच्या विरोधात विशेष न्यायालयात १ सहस्र ८३७ पानांचे आरोपपत्र प्रविष्ट केले. सुरक्षाविषयक नियमांचे उल्लंघन करून शत्रूराष्ट्राला गोपनीय माहिती पुरवल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणात झारा हिला सहआरोपी करण्यात आले आहे. ‘झारा’ ही पाकिस्तानी महिला गुप्तहेराने डॉ. कुरुलकर यांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांच्याकडून ही माहिती मिळवली होती.
संपादकीय भूमिकाशत्रूराष्ट्राला देशाशी निगडित संवेदनशील माहिती पुरवणार्या अशांना फाशीची शिक्षा द्या ! |