यावर्षी भारतातील ४ सहस्र महिलांनी पुरुषांविना हज यात्रा केली ! – पंतप्रधान मोदी
नवी देहली – यंदाच्या वर्षी प्रथमच देशातून ५० किंवा १०० नव्हे, तर ४ सहस्र मुसलमान महिला एकट्याच, म्हणजे पुरुषांविना हज यात्रा करून आल्या, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरील ‘मन की बात’ या मासिक कार्यक्रमात दिली. पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, यापूर्वी महिलांना पुरुषांविना हज यात्रेला जाण्याची अनुमती नव्हती. हज यात्रा करून आलेल्या अनेक महिलांनी मला पत्र पाठवून आशीर्वाद दिला आहे.