राहुरी (अहिल्यानगर) येथे शाळकरी मुलींसाठी रचले लव्ह जिहाद आणि धर्मांतर यांचे षड्यंत्र !
शिक्षिकेसह ५ धर्मांधांना अटक !
अहिल्यानगर – राहुरी तालुक्यातील उंबरे गावात हिना शेख यांनी ३ वर्षांपासून गावात खासगी शिकवणी चालू केली होती. या शिकवणीसाठी येणार्या इयत्ता सातवी-आठवीतील अल्पवयीन मुलींचे धर्मांतर करण्याचा, तसेच त्यांची मुसलमान तरुणांशी ओळख वाढवण्याचा सल्ला हिना मुलींना देत होत्या. २६ जुलै या दिवशी हे लक्षात आल्यावर गावात दोन गटांत हाणामारी होऊन दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. त्यानंतर पहिल्या पीडित अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून या घटनेतील आरोपी आवेज शेख आणि कैफ शेख यांच्यावर गुन्हे नोंद करण्यात आले. २८ जुलैला आणखी २ अल्पवयीन मुलींनी राहुरी पोलिसात तक्रार दिली आहे. शिकवणीला येणार्या अल्पवयीन मुलींच्या धर्मांतरासाठी साहाय्य करणार्या ८ आरोपींपैकी अल्ताफ शेख, कैफ शेख, शाकीर शेख, हिना शेख आणि सलीम शेख या ५ जणांना राहुरी पोलिसांनी कह्यात घेतले आहे. एक जण नगर येथे उपचार घेत आहे, तर एक जण अद्याप पसार असून एका अल्पवयीन मुलीचा आरोपींमध्ये समावेश आहे.
येथील धर्मांतराचा विषय २८ जुलै या दिवशी विधान परिषदेत चर्चेला आल्यानंतर उच्चस्तरीय चौकशीचे आदेश सभापती डॉ. नीलम गोर्हे यांनी दिले आहेत. पहिल्या प्रकरणातील आरोपीचे नाव उघड झाल्यानंतर आता याच आरोपींनी अनेक मुलींची फसवणूक केली असल्याचे समोर आले आहे. हा सर्व प्रकार अनेक दिवसांपासून चालू असून केवळ लव्ह जिहादचा प्रकार असल्याने यापासून लक्ष दूर करण्यासाठी प्रार्थनास्थळाची तोडफोड केल्याचा आरोप हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी केला आहे.
हिंदु धर्म सोडून मुसलमान धर्म स्वीकारण्याची धमकी !पीडित अल्पवयीन मुलींनी सांगितले की, हिना शेख आणि इतर आरोपींनी ‘तुम्ही हिंदु धर्म सोडून आमचा मुसलमान धर्म स्वीकारा, तसेच बुरखा घालत जा, म्हणजे हिंदु मुले तुम्हाला त्रास देणार नाहीत. आमच्या मुसलमान धर्माच्या मुली जशा रहातात, तशाच पद्धतीने रहात जा. तुम्ही नेहमी हिंदीमध्ये बोलून मुसलमान मुलामुलींशी मैत्री वाढवा. आपण लवकर घर सोडून पळून जाऊ’, असे बोलून आमचे न ऐकल्यास मुलींचे छायाचित्र प्रसारित करण्याची धमकी दिली. |
संपादकीय भूमिका
|