रायबाग (बेळगाव) येथील साधिका सौ. सुरेखा विनोद सुतार यांना रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात आलेल्या अनुभूती
१. मला पुष्कळ आनंद आणि चैतन्यमय वाटले.
२. ध्यानमंदिरातील आरती ऐकतांना माझ्या अंगावर रोमांच आले आणि माझी भावजागृती झाली. ‘मी जणूकाही प.पू. गुरुदेवांच्या चरणांजवळ बसलेेे आहे’, असे मला जाणवले. त्या वेळी माझे अंतःकरण भरून आले.
३. सेवा करतांना मला चैतन्य आणि आनंद जाणवत होता. ‘परात्पर गुरुदेव माझ्या समोरच आहेत’, असे मला जाणवत होते. त्या वेळी मी गुरुदेवांच्या चरणी सतत कृतज्ञता व्यक्त करत होते.
४. प्रार्थना
हीच जाणीव राहो, माझ्या हृदयी ।
तव चरणांची धूळ बनूनी ॥ १ ॥
रहावे वाटे सर्वस्व अर्पूनी ।
हीच प्रार्थना तव चरणांशी ॥ २ ॥’
– सौ. सुरेखा विनोद सुतार, रायबाग, बेळगाव. (१६.१०.२०२२)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |