‘हलाल जिहाद’विषयी बहुसंख्य हिंदू निद्रिस्तच !
(हलाल म्हणजे इस्लामनुसार जे वैध आहे ते)
इंदूर (मध्यप्रदेश) येथे प्रसार करतांना असे लक्षात आले की, ‘हलाल जिहाद’विषयी बहुतेक हिंदूंना काहीही माहिती नाही. अगदी सनदी लेखापाल, अधिवक्ते, आधुनिक वैद्य यांनाही याची जराही कल्पना नाही. मग जे अल्प शिकलेले आणि गावांमध्ये रहाणारे यांना त्याविषयी ठाऊक असण्याची शक्यता जवळजवळ नाहीच. तेथे छोट्या बैठकांमधून ‘हलाल जिहाद’ हा विषय ऐकल्यावर अनेक जण ‘आम्हाला प्रथमच हा विषय कळला आणि भीषणता लक्षात आली’, असा अभिप्राय व्यक्त करतात. सर्वसामान्य हिंदू खरोखरच निद्रिस्त आहेत. यावरून हिंदु जनजागृती समिती ‘हलाल जिहाद’विषयी करत असलेली जागृती आणि समितीच्या कार्याला असलेली ईश्वरीकृपा यांचे महत्त्व लक्षात येते.
– श्री. श्रीराम काणे, इंदूर, मध्यप्रदेश (२१.७.२०२३)