चीनने कंबोडियामध्ये उभारलेला नौदलाचा तळ भारतासाठी धोकादायक !
या सैन्यतळापासून बंगाल खाडीतील भारतीय सैन्यतळ १ सहस्र २०० किलोमीटर दूर
नामपेन्ह – चीनने कंबोडिया देशात नौदलाचा तळ उभारत असून त्याचे बांधकाम जवळजवळ पूर्ण झाले आहे. उपग्रहाद्वारे या नौदलाच्या तळाची छायाचित्रे काढण्यात आली आहे. त्यावरून तेथे मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा उभारण्यात येत असून यामध्ये नौसैनिकांना रहाण्यासाठी निवास व्यवस्था, नौदलाचे भव्य कायार्र्लय, नौदलाची लढाऊ जहाजे उभी करण्यासाठी बंदराची उभारणी आदींचा समावेश आहे. चीनने कंबोडियाला मोठ्या प्रमाणात कर्ज दिले; मात्र हे कर्ज फेडण्यास कंबोडियाला शक्य न झाल्याने त्याने वर्ष २०१७ मध्ये नौदलाचे तळ चीनकडे सुपुर्द केले. (नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंका या देशांनाही चीनने मोठ्या प्रमाणात कर्ज दिले. त्यांना ते फेडता न आल्यामुळे हे देश चीनचे गुलाम बनले. कंबोडियाच्या संदर्भातही तेच घडले आहे ! – संपादक) त्यानंतर चीनने तेथे मोठ्या प्रमाणात बांधकाम चालू केले.
कंबोडिया में चीन का नेवल बेस बनकर तैयार, अंडमान से सिर्फ 1200 किलोमीटर दूर पहुंचा ड्रैगन, कितना बड़ा खतरा? #china #indiachina #cambodia #xijinping #indiannavy #navy #चीन #भारत #कंबोडिया #शीजिनपिंग https://t.co/0MtOFnsXT7
— Oneindia Hindi (@oneindiaHindi) July 30, 2023
१. हे नौदलाचे तळ बंगालच्या खाडीत असलेल्या भारतीय सैन्य तळापासून केवळ १ सहस्र २०० किलोमीटर दूर असल्यामुळे भारताची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. (चीन भारतीय सैन्यतळापासून १ सहस्र २०० किलोमीटर अंतरावर नौदलाचा तळ उभारत असल्याची माहिती भारतीय गुप्तचर यंत्रणांना मिळाली होती का ?, हे भारतियांना कळायला हवे ! – संपादक)
२. ब्रिटीश संरक्षणतज्ञ चैथम हाऊस यांनी दिलेल्या माहितीनुसार ४ वर्षांपूर्वी अमेरिकी गुप्तचर संस्थेला या नौदल तळाविषयी प्रथम माहिती मिळाली. त्यानंतर अनेक देशांच्या गुप्तचर संस्थांनी या नौदलाच्या तळाविषयी माहिती मिळवण्यास आरंभ केला.
३. या नौदलामुळे चिनी सैनिकांना दक्षिण पूर्व एशियातील वादग्रस्त समुद्री क्षेत्रापर्यंत पोचण्यास साहाय्य होणार आहे.
संपादकीय भूमिकाचीनच्या वाढत्या कुरापतींना प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने युद्धसज्ज होणे आवश्यक आहे ! |