ढाका (बांगलादेश) येथे वेगवेगळ्या ठिकाणी ४ बाँबस्फोट
पोलिसांनी ६ जिवंत बाँब केले जप्त !
ढाका (बांगलादेश) – येथील अमीनाबाजार आणि सावर या भागांमध्ये २९ जुलैच्या दुपारी ४ बाँबस्फोट झाले, तर पोलिसांनी ६ जिवंत बाँब जप्त केले. या स्फोटांमध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही. हे बाँबस्फोट कुणी आणि कशासाठी केले ?, हे अद्याप समजू शकलेले नाही.