मॉस्कोवर ड्रोनद्वारे आक्रमण
मॉस्को – शहरात ड्रोनद्वारे आक्रमण करण्यात आले असून रशियाने या आक्रमणासाठी युक्रेनला उत्तरदायी ठरवले आहे. या आक्रमणामुळे २ इमारतींची हानी झाली आहे, तसेच १ जण घायाळ झाला आहे. शहराच्या महापौरांनीही आक्रमण झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले की, रशियाच्या हवाईदलाने युक्रेनचे एक ड्रोन नष्ट केले आहे. मागील आठवड्यात शहरावर २ ड्रोनद्वारे आक्रमण करण्यात आले होते. हे आक्रमण युक्रेनने केल्याचा आरोप रशियाने केला होता.
Russian authorities say three Ukrainian drones attacked Moscow on Sunday, injuring one. There was no immediate comment from Ukrainian officials. https://t.co/SkI4hWfg4u
— USA TODAY (@USATODAY) July 30, 2023