देहली येथे मोहरमच्या मिरवणुकीत धर्मांध मुसलमानांकडून हिंसाचार
|
नवी देहली – देहलीच्या नांगलोई या भागात २९ जुलैच्या सायंकाळी मोहरमच्या मिरवणुकीत धर्मांध मुसलमानांनी केलेल्या हिंसाचारात ६ पोलिसांसह १२ जण घायाळ झाले. येथे मोठ्या प्रमाणात दुचाकी, चारचाकी, बस आदी वाहनांची तोडफोड करण्यात आली. मिरवणुकीत सहभागी झालेल्या धर्मांध मुसलमानांनी तलवारी उपसल्याचे व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहेत.
मुहर्रम पर जि हादी चरमपंथ से थर्रा उठी दिल्ली
नागलोई में मुहर्रम पर भयावह हिंसा, जि हादी झुंड ने बरसाए पत्थर, आम लोगों को बनाया निशाना
आखिर कहां से आती है ये हिंसक सोच ? pic.twitter.com/mCbBliLwom
— Sudarshan News (@SudarshanNewsTV) July 29, 2023
पोलीस उपायुक्त हरेंद्र सिंह यांनी सांगितले की, मिरवणुकीमध्ये १० सहस्रांहून अधिक जण सहभागी झाले होते. त्यामुळे रोहतक रस्त्यावरील काही लोकांनी मिरवणूक नियोजित मार्गाऐवजी अन्य मार्गाने नेण्याचा प्रयत्न केला. यास पोलिसांनी नकार दिल्याने काही जण हिंसक झाले. त्यांनी पोलिसांवर दगडफेक केली. रस्त्यावरून चालणार्या पादचार्यांनाही लक्ष्य करण्यात आले. पोलिसांनी सौम्य लाठीमार करून त्यांना पांगवले आणि तात्काळ व्यवस्था पूर्ववत् झाली. परिसरातील परिस्थिती नियंत्रणात असून दोषींवर कायदेशीर कारवाई केली जाईल.
संपादकीय भूमिका
|