काँग्रेसच्या मुसलमान नेत्याने स्वतःच्या पक्षाचे नेते सचिन पायलट यांनाच विचारला जाब !
राजस्थानमधील काँग्रेस सरकारने जयपूर बाँबस्फोटातील मुसलमान आरोपींच्या सुटकेला सर्वोच्च न्यायालयात दिलेल्या आव्हानाचे प्रकरण
जयपूर (राजस्थान) – येथे १८ मे २००८ या दिवशी सलग ८ बाँबस्फोट झाले होते. यात ७१ लोकांचा मृत्यू झाला होता, तर १८५ जण घायाळ झाले होते. या प्रकरणी वर्ष २०१९ जयपूर जिल्हा न्यायालयाने ४ आरोपींना दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली होती. याला राजस्थान उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आल्यावर २९ मार्च २०२३ मध्ये सर्व आरोपींना न्यायालयाने निर्दोक्त मुक्त केले. त्याला पीडितांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. या प्रकरणात राजस्थानच्या काँग्रेस सरकारवर टीका झाल्याने सरकारने ४० दिवसांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. सरकारचे हे पाऊल राज्यातील मुसलमानांना पटलेले नाही. याविषयी स्वतः काँग्रेसच्याच पदाधिकार्याने राज्याचे काँग्रेसचे नेते आणि मंत्री सचिन पायलट यांना जाब विचारला. या संदर्भातील व्हिडिओ या मुसलमान पदाधिकार्याने त्याच्या फेसबुक खात्यावरून प्रसारित केला आहे.
2 दिन पहले सचिन पायलट टोंक गये थे , तो शान्तिप्रिय समुदाय के लोग उन्हें घेर कर पुछ रहे हैं की जब जयपुर बम धमाकों के आतंकियों को हाईकोर्ट ने रिहा कर दिया तो उसके खिलाफ आपकी सरकार सुप्रीम कोर्ट क्यों गई ?
कांग्रेस राज में इन लोगों की कितनी हिम्मत हो जाती है , जयपुर बम धमाकों में… pic.twitter.com/WhBjZhpAmM
— Laxmikant bhardwaj (@lkantbhardwaj) July 29, 2023
राजस्थानमध्ये विधानसभेच्या निवडणुका होण्याची शक्यता असल्याने सचिन पायलट त्यांच्या टोंक येथील मतदारसंघात गेले असता तेथे त्यांचा वाहन ताफा अडवून लोकांनी त्यांच्या समस्या सांगितल्या. तेव्हा येथील काँग्रेसच्या अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेश सरचिटणीस मोहसीन राशिद यांनी सचिन पायलट यांना ‘जयपूर बाँबस्फोटांतील आरोपींच्या सुटकेच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात सरकारने आव्हान का दिले ?’, असा प्रश्न विचारला. राशिद म्हणाले, ‘सरकारच्या या भूमिकेमुळे मुसलमान खुश नाहीत.’ यावर सचिन पायलट यांनी राशिद यांना, ‘धर्माविषयी न बोलता पक्षाचे काम करा’, असा सल्ला दिला. यानंतर राशिद याने कन्हैयालाल यांचा शिरच्छेद करणारे नासिर आणि जुनैद या आरोपींच्या संदर्भातही पायलट काहीच बोलले नव्हते, यावरूनही प्रश्न विचारला. या वेळी सचिन पायलट काही न बोलता गाडीत बसून निघून गेले. या घटनेचा व्हिडिओ राशिद यांनी फेसबुकवरून प्रसारित केला आहे.
संपादकीय भूमिका
|