घुसखोर रोहिंग्या देशासाठी धोकादायक ! – आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा

नवी देहली – रोहिंग्या मुसलमान आसाम राज्याच्या सीमेवरून भारतात घुसखोरी करत असले, तरी ते येथे रहात नाहीत. त्यामुळे आसामला त्यांचा धोका नसला, तरी देशासाठी ते धोकादायकच आहेत, असे विधान आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी केले.

मुख्यमंत्री सरमा पुढे म्हणाले की, रोहिंग्या घुसखोर आसाममार्गे पुढे देहली आणि काश्मीर येथे जातात. घुसखोरीसाठी त्यांना त्रिपुरातील दलाल साहाय्य करत आहेत. गेल्या काही वर्षांपासून हे चालू आहे. जर एखादा विदेशी नागरिक पारपत्र आणि व्हिसा (देशात रहाण्याची अनुमती) यांच्याविना भारतात येत असेल, तर तो भारताच्या सार्वभौमत्वासाठी धोका आहे. भारतात अनधिकृतपणे प्रवेश करणारे, मग ते रोहिंग्या मुसलमान असोत किंवा हिंदू असोत, त्यांना आपण प्रोत्साहन देऊ शकत नाही. पोलीस महासंचालकांना घुसखोरी रोखण्यासाठी यापूर्वीच पावले उचलण्यास सांगण्यात आले आहे. करीमगंज जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांना घुसखोरी रोखण्यासाठी पहारा वाढवण्यास सांगण्यात आले आहे.