तमिळनाडू आतंकवाद्यांचा कारखाना होत आहे !

पाळा संतोष कुमार

नवीन संसदेमध्‍ये स्‍थापन करण्‍यात आलेले ‘सेंगोल’ (राजदंड) हे चोल राजांचे धर्मप्रतीक आहे. संसदेमध्‍ये सेंगोलची स्‍थापना हे हिंदु राष्‍ट्राच्‍या दिशेने पडलेले पाऊल आहे. तमिळनाडू ही योगीजनांची भूमी आहे. हिंदु धर्मप्रसाराचे महान कार्य या भूमीतून झाले आहे. सद्यःस्‍थितीत मात्र तमिळनाडूमध्‍ये आतंकवादी कारवाया वाढत आहेत. हे आतंकवादी अफगाणिस्‍तानच्‍या आतंकवाद्यांशी जोडलेले आहेत. तमिळनाडू हा आतंकवाद्यांचा कारखाना होत आहे. मागील काही वर्षांत तमिळनाडूमध्‍ये आतंकवाद्यांनी बाँबस्‍फोट केले, तसेच गेल्‍या काही वर्षांत धर्मांधांनी तमिळनाडूमधील १५० हून अधिक हिंदुत्‍वनिष्‍ठांच्‍या हत्‍या केल्‍या आहेत. तमिळनाडू सरकार आणि काही राष्‍ट्रीय नेते या धर्मांधांच्‍या कारवायांविषयी एकही शब्‍द बोलत नाहीत. हिंदुत्‍वाचे कार्य करणार्‍यांना खोट्या खटल्‍यांमध्‍ये गुंतवून अटक करण्‍यात येत आहे. धर्मकार्यावरील हे आघात आम्‍हाला हिंदुत्‍वाचे कार्य करण्‍यासाठी प्रेरणा देत आहेत. स्‍वामी विवेकानंद यांनी युवकांना जागृत केले, त्‍याप्रमाणे आमच्‍या संघटनेद्वारे युवकांमध्‍ये जागृती निर्माण करण्‍याचे कार्य चालू आहे.

– श्री. पाळा संतोष कुमार, संस्‍थापक अध्‍यक्ष, हिंदू येलूच्‍ची पेरवाई  (हिंदु युवा जागृत मंच), तमिळनाडू. (२२.७.२०२३)