‘ज्‍योतिषशास्‍त्राची अन्‍य भारतीय शास्‍त्रांशी सांगड घालणे’ या संदर्भातील संशोधनात सहभागी होण्‍याची ज्‍योतिषशास्‍त्राच्‍या अभ्‍यासकांना सुवर्णसंधी !

‘प्राचीन भारतीय ऋषिमुनींनी मानवाच्‍या सर्वांगीण उन्‍नतीसाठी अनेक शास्‍त्रे निर्माण केली, उदा. ज्‍योतिषशास्‍त्र, वास्‍तूशास्‍त्र, आयुर्वेद, संगीत, मंत्रशास्‍त्र इत्‍यादी. ‘महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालया’च्‍या वतीने ज्‍योतिषशास्‍त्रात संशोधनकार्य चालू आहे. त्‍या अंतर्गत ज्‍योतिषशास्‍त्राची अन्‍य भारतीय शास्‍त्रांशी (वास्‍तूशास्‍त्र, आयुर्वेद, संगीत, मंत्रशास्‍त्र इत्‍यादींशी) सांगड घालणारा संशोधनात्‍मक अभ्‍यास करायचा आहे, उदा. एखाद्या वैद्यांनी सांगितले की, अमुक आजार अमुक कालावधीनंतर वाढेल किंवा न्‍यून होईल, तर व्‍यक्‍तीच्‍या कुंडलीवरून ते लक्षात येऊ शकते का ? ‘एखाद्याची किती वयानंतर आध्‍यात्‍मिक प्रगती होईल ?’, हे त्‍याची कुंडली बघून कळू शकते का ? इत्‍यादी. यासंदर्भातील संशोधनाचे विषय पुढे दिले आहेत.

१. ज्‍योतिषशास्‍त्र आणि आयुर्वेद

अ. आयुर्वेदातील वात, पित्त आणि कफ या त्रिदोषांचा ज्‍योतिषशास्‍त्रातील ग्रह, राशी अन् नक्षत्रे यांच्‍याशी असलेला संबंध उलगडणे

आ. जन्‍मकुंडलीवरून व्‍यक्‍तीची प्रकृती, प्रतिकारशक्‍ती, तिला होणारे संभाव्‍य रोग आणि व्‍याधी अन् आयुष्‍यमान यांचा अभ्‍यास करणे

इ. ‘विविध रोग आणि व्‍याधी यांना कारणीभूत असणारे जन्‍मकुंडलीतील ग्रहयोग कोणते ?’, याचा अभ्‍यास करणे

ई. ‘रोग आणि व्‍याधी कोणत्‍या कालावधीत बळावतील किंवा न्‍यून होतील ?’, हे ग्रहस्‍थितीवरून जाणणे

श्री. राज कर्वे

२. ज्‍योतिषशास्‍त्र आणि वास्‍तूशास्‍त्र

अ. वास्‍तूशास्‍त्रातील अष्‍टदिशा आणि ज्‍योतिषशास्‍त्रातील ग्रह अन् राशी यांच्‍यातील संबंध उलगडणे

आ. ‘जन्‍मकुंडलीतील ग्रहयोगांप्रमाणे व्‍यक्‍तीला चांगली किंवा दोषयुक्‍त वास्‍तू मिळते का ?’, याचा अभ्‍यास करणे

३. ज्‍योतिषशास्‍त्र आणि संगीत

अ. संगीतातील स्‍वर, राग आदींचा ज्‍योतिषशास्‍त्रातील ग्रह, राशी आदींशी असलेला संबंध उलगडणे

आ. ‘ग्रहदोषांच्‍या निवारणासाठी संगीत-उपचार उपयुक्‍त ठरतात का ?’, याचा अभ्‍यास करणे

इ. ‘गायन, वादन आणि नृत्‍य या कला अवगत होण्‍यासाठी जन्‍मकुंडलीत आवश्‍यक असणारे ग्रहयोग कोणते ?’, याचा अभ्‍यास करणे

४. ज्‍योतिषशास्‍त्र आणि मंत्रशास्‍त्र

अ. विविध देवता, अक्षरे अन् अंक यांचा ग्रह, राशी अन् नक्षत्रे यांच्‍याशी असलेला संबंध उलगडणे

आ. ‘ग्रहदोषांच्‍या निवारणासाठी कोणते मंत्रजप, अंकजप, देवतांचे नामजप इत्‍यादी उपयुक्‍त असतात ?’, याचा अभ्‍यास करणे

इ. ‘जन्‍मकुंडलीवरून व्‍यक्‍तीने कोणत्‍या देवतेची उपासना करावी ?’, याचा अभ्‍यास करणे

५. ज्‍योतिषशास्‍त्र आणि अध्‍यात्‍मशास्‍त्र

अ. जन्‍मकुंडलीवरून व्‍यक्‍तीचा स्‍वभाव, तिची आध्‍यात्मिक वैशिष्‍ट्ये, साधनामार्ग, पूर्वजन्‍मीची साधना इत्‍यादींच्‍या संदर्भात अभ्‍यास करणे

आ. जन्‍मकुंडलीवरून व्‍यक्‍तीला साधनेसाठी लाभलेली अनुकूल किंवा प्रतिकूल परिस्‍थिती, तिला असलेला आध्‍यात्मिक त्रास, इष्‍ट-अनिष्‍ट प्रारब्‍ध, चित्तात असलेले संस्‍कार इत्‍यादींच्‍या संदर्भात अभ्‍यास करणे

इ. जन्‍मकुंडलीवरून व्‍यक्‍तीची आध्‍यात्मिक उन्‍नती होण्‍यासाठी पूरक काळ जाणणे

ई. ‘मृत्‍यूकुंडली (व्‍यक्‍तीच्‍या मृत्‍यूच्‍या वेळची कुंडली) मांडून जिवाची मृत्‍यूत्तर स्‍थिती कळते का ?’, याचा अभ्‍यास करणे

वरील संशोधन कार्यात सहभागी होऊ इच्‍छिणार्‍यांना त्‍या विषयाच्‍या कुंडल्‍या पाठवल्‍या जातील.’

– श्री. राज कर्वे (ज्‍योतिष विशारद), महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालय, गोवा. (२१.७.२०२३)

इ-मेल – mav.research2014@gmail.com


साधकांना सूचना आणि ज्‍योतिषशास्‍त्राचे अभ्‍यासक, वाचक, हितचिंतक अन् धर्मप्रेमी यांना नम्र विनंती !

‘महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालया’च्‍या अंतर्गत ‘ज्‍योतिषशास्‍त्राची अन्‍य भारतीय शास्‍त्रांशी सांगड घालणे’ या संदर्भातील संशोधन कार्यात सहभागी होऊन साधनेच्‍या सुवर्णसंधीचा लाभ घ्‍या !

या संशोधन कार्यात सहभागी होऊ इच्‍छिणार्‍यांनी जिल्‍हासेवकांच्‍या माध्‍यमातून पुढील सारणीनुसार आपली माहिती mav.research2014@gmail.com या संगणकीय पत्त्यावर अथवा टपाल पत्त्यावर पाठवावी. इ-मेल पाठवतांना त्‍याच्‍या विषयामध्‍ये ‘ज्‍योतिषशास्‍त्राची अन्‍य भारतीय शास्‍त्रांशी सांगड घालणे’, असा कृपया उल्लेख करावा.

टपालासाठी पत्ता : श्री. आशिष सावंत, द्वारा ‘महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालय’, भगवतीकृपा अपार्टमेंट्‍स, एस्-१, दुसरा मजला, बिल्‍डिंग ए, ढवळी, फोंडा, गोवा ४०३४०१