मंदिरात वस्त्रसंहिता लागू करणे हा राज्यघटनेने विश्वस्तांना दिलेला अधिकार ! – ह.भ.प. अभय महाराज सहस्रबुद्धे, विश्वस्त, संस्थान श्री भार्गवराम परशुराम
वस्त्रसंहिता लागू करण्यासाठी चिपळूण येथील मंदिरांचे विश्वस्त आग्रही !
चिपळूण २८ जुलै (वार्ता.) – सात्त्विकतेने ओतप्रोत असा हिंदु धर्म असून सात्त्विक वस्त्रसंहिता हा त्याचाच एक भाग आहे. मंदिर परिसर हा मंदिराच्या अखत्यारीत असलेला भाग आहे. तेथे काय असावे? हे ठरवण्याचा अधिकार विश्वस्तांना आहे. आज धार्मिक पर्यटनाचे रूपांतर मौजमजेच्या पर्यटनात झाले असून मंदिरांत उत्तेजक कपडे घालून लोक येतात. त्यामुळे मंदिरांत वस्त्रसंहिता लागू करणे, हा राज्यघटनेने धार्मिक स्वातंत्र्याच्या अंतर्गत विश्वस्तांना दिलेला अधिकार आहे, असे मार्गदर्शन संस्थान श्री भार्गवराम परशुरामचे विश्वस्त ह.भ.प. अभय महाराज सहस्रबुद्धे यांनी केले.
‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’ने मंदिर वस्त्रसंहितेविषयी चालू केलेल्या चळवळीच्या अंतर्गत येथील चितळे मंगल कार्यालयात मंदिर विश्वस्तांची बैठक झाली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी जळगाव येथे मंदिर अधिवेशनामध्ये उपस्थित राहिलेले श्रीदेव गोपाळ कृष्ण मंदिराचे श्री. रमेश कानजी नंदा यांनी अधिवेशनासंबंधी स्वत:चे अनुभवही सांगितले. हिंदु जनजागृती समितीचे श्री. दत्ताराम घाग यांनी बैठकीचा उद्देश सांगितला.
बैठकीतील वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे !
१. सर्वच विश्वस्तांनी मंदिरांत वस्त्रसंहिता लागू करण्यास सहमती दर्शवली.
२. मंदिर संस्कृती रक्षणासाठी मंदिराच्या विश्वस्तांच्या बैठका नियमित झाल्या पाहिजेत, असे सर्वानुमते ठरले.
मंदिर विश्वस्तांची मनोगते१. श्री. महेश पोंक्षे, अध्यक्ष, श्रीदेवी विंध्यवासिनी देवस्थान, चिपळूण – वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय त्वरित घेऊ. मंदिराबाहेर आणि मंदिरात फलक लावू. २. श्री. मनोहर शिंदे, खजिनदार, श्री रामवरदायिनी मंदिर, दादर, दसपटी – धर्म संस्कृतीच्या परंपरा राखणे आवश्यक आहे. यात आमचाही सहभाग राहील. ३. श्री. कृष्णा पंडित आणि श्री. दत्तात्रय पंडित, विश्वस्त श्री शारदादेवी मंदिर, तुरंबव, चिपळूण – समितीच्या या चळवळीत आमचाही सहभाग असेल. ४. श्री. सुनील घाणेकर, श्री देव केदारनाथ मंदिर, आयनी, खेड – हा उपक्रम आम्ही आमच्या मंदिरात लागू करू, यासाठी संबंधितांची लवकरच बैठक आयोजित करू. ५. श्री कृष्णा मोरे, मुख्य विश्वस्त, श्री देवी सुकाई चंडिकाई देवस्थान (शिरळ, वैजी, मालघर) – मंदिरात वापरण्याच्या वस्त्रांविषयी प्रबोधन करणे आवश्यक आहे. ६. ह.भ.प. दत्ताराम आयरे, श्री झोलाई मंदिर, वालोपे – आज मंदिरात दर्शनासाठी जातांना कोणती वस्त्रे परिधान करावीत ? याविषयी शिस्त लावणे आवश्यक आहे. |
उपस्थित मंदिर विश्वस्त
श्री. प्रकाश शिंदे, वाघजाई मंदिर, कोळकेवाडी; श्री. विनय चितळे आणि श्री. श्रीनिवास परांजपे, श्रीदेवी विंध्यवासिनी देवस्थान, चिपळूण; श्री. नामदेव घाग, श्री रामवरदायिनी मंदिर, सोनगाव; ह.भ.प. दशरथ मोडक अन् ह.भ.प. गणपत मोडक, श्री काळेश्रीदेवी मंदिर, कान्हे ; श्री. प्रफुल्ल मोरे, श्री देवी सुकाई चंडिकाई देवस्थान, शिरळ; श्री. मोहन तांबट, श्री महाकाली मंदिर पेठ माप; श्री. गोविंद चितळे, श्री लक्ष्मी नारायण मंदिर, चिपळूण; श्री. गणेश आग्रे, श्री. शंकर मंदिर, ओझरवाडी, चिपळूण; श्री. गंगाराम गोटल, श्री पावणाईदेवी मंदिर, सात्विण गाव; श्री. मुकुंद वारे, श्री कामधेनू मंदिर, पेढे; श्री. संदीप शिंदे, श्री. दिनेश शिंदे, श्री. रघुनाथ दळवी आणि श्री. विठ्ठल मनवळ, श्री देव केदारनाथ मंदिर,आयनी, खेड; श्री. रवींद्र शिंदे आणि श्री. किशोर शिंदे, श्री सुकाईदेवी मंदिर, पेढांबे, चिपळूण; श्री. शंकर चव्हाण, श्री सुकाईदेवी मंदिर, पाग; श्री. खरताराम चौधरी, श्री. पारस प्रजापती आणि श्री. उद्धाराम गुर्जर, श्री आंबामाता मंदिर, खेर्डी; श्री. हनुमंत चव्हाण, श्री. मारुति मंदिर, मोरवणे आणि श्री. रामदास घाग, सचिव, श्री केदारनाथ मंदिर, खरवते.
संपादकीय भूमिकामंदिरांचे पावित्र्य टिकवण्यासाठी वस्त्रसंहिता लागू करण्यास आग्रही असणार्या मंदिर विश्वस्तांचे अभिनंदन ! |