भवसागरातून मुक्त होण्याचा मार्ग !
‘जीवात्मा जितका लोकांचे ऐकून आणि त्यांच्या संगतीने अयोग्य वागेल, तितका तो मायेतील गोष्टींच्या अधीन होत जाईल आणि तो जितका भगवंताच्या अनुसंधान राहील, ईश्वरप्राप्तीच्या दृष्टीने चिंतन-मनन करील, तितका तो भगवंताच्या जवळ जाऊन या भवसागरातून मुक्त होईल.’
‘ज्या दिवशी सत्संग मिळेल, सत्संगात आपली रुची निर्माण होईल, तेव्हा समजावे की, भगवंताची कृपा आपल्यावर होत आहे.’
(संदर्भ : लोक कल्याण सेतू, जानेवारी २०२२)