पश्चिम महाराष्ट्रातील ४ जिल्ह्यांतील १४४ गावे दरडप्रवण भागात, तर ५९४ पूरप्रवण क्षेत्रे असल्याचे स्पष्ट !
(दरडप्रवण म्हणजे दरड कोसळण्याची शक्यता असलेला भाग आणि पूरप्रवण म्हणजे पूर येण्याची शक्यता असलेला भाग)
पुणे – पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या ४ जिल्ह्यांमधील १४४ गावे दरडप्रवण भागात असून ५ जिल्ह्यांत ५९४ पूरप्रवण क्षेत्रे असल्याचे भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, तसेच भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण यांनी केलेल्या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ११ तालुक्यांत ७६ दरडप्रवण गावे आहेत, तर सातारा ४१, पुणे २३ आणि सांगली येथे ४ दरडप्रवण भाग आहेत; मात्र यातील केवळ ११ गावांनी पुनर्वसनाचा प्रस्ताव पाठवला आहे. सातारा गावातील ७ अतीधोकादायक गावांचे तात्काळ पुनर्वसन केले आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.