सोलापूर जिल्ह्यातील पीक विमा आस्थापनांचे ऑडिट करावे ! – राम सातपुते, आमदार, भाजप
मुंबई, २९ जुलै (वार्ता.) – शेतकरी बांधव कष्टाने पीक विम्याचा हप्ता भरतो; मात्र विमा आस्थापने शेतकर्यांना फसवतात. सोलापूर जिल्ह्यातील शेतकर्यांनी ३ वर्षांत विम्यासाठी भरलेल्या पैशांचे लेखा परीक्षण करून आस्थापनांवर कारवाई करणार का ? असा प्रश्न माळशिरस येथील भाजपचे आमदार राम सातपुते यांनी विधानसभेत उपस्थित केला. यावर कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी सोलापूर जिल्ह्यातील विमा आस्थापनांची माहिती घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले. ते म्हणाले की, राज्य सरकारने यंदापासून १ रुपयात शेतकर्यांना पीक विमा देण्याचा निर्णय घेतला असून १ कोटी १४ लाख ५३ सहस्रांहून अधिक शेतकर्यांनी याचा लाभ घेतला.