महाराष्ट्र शाहीर परिषदेच्या वतीने क्रांतीशाहीर दीक्षित यांची ७४ वी पुण्यतिथी साजरी !
सांगली – येथे महाराष्ट्र शाहीर परिषद आणि लोककलावंत विकास परिषद सांगली यांच्या वतीने क्रांतीशाहीर कै. ग.द. दीक्षित यांच्या ७४ व्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते. नगरसेवक जगन्नाथ जाधव यांनी प्रतिमापूजन केले, तर शाहीर बजरंग आंबी यांनी कै. दीक्षित यांच्या कार्याची माहिती दिली. या वेळी शाहीर मोहन यादव, रामचंद्र जाधव, देवानंद माळी, अवधूत विभूते, प्रताप मोरे, पांडुरंग गवळी, बाबुराव कुंभार, मधुकर चव्हाण, विजया बुधगांवकर, भगवान माने उपस्थित होते.