कोल्हापूर येथे काँग्रेसवाल्यांचे पू. भिडेगुरुजी यांच्या विरोधात आंदोलन !
कोल्हापूर – अमरावती येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी म. गांधी यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ २९ जुलैला ‘कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटी’च्या वतीने काँग्रेस पक्षाच्या कार्यालयासमोर निषेध आंदोलन करण्यात आले. आमदार ऋतुराज पाटील आणि आमदार जयश्री जाधव या दोन काँग्रेस आमदारांच्या उपस्थितीत पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्याविषयी अश्लाघ्य भाषा वापरण्यात आली. या प्रसंगी आमदार ऋतुराज पाटील यांनी पू. भिडेगुरुजी यांना त्वरित अटक करावी, अशी मागणी केली, तर एका काँग्रेस महिला पदाधिकारीने ‘पू. भिडेगुरुजी यांना सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांत फिरू देणार नाही’, असे सांगितले. (औरंगजेबाच्या ‘स्टेटस’ प्रकरणी किंवा आतंकवाद्यांनी जंगलात बाँबस्फोट केल्याप्रकरणी आंदोलन न करणार्या काँग्रेसवाल्यांचे पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्याविरोधात आंदोलन म्हणजे त्यांना झालेली हिंदुद्वेषाची कावीळच ! – संपादक)