डेहराडून (उत्तराखंड) येथे धर्मांध मुसलमानांकडून हिंदु विद्यार्थ्यावर प्राणघातक आक्रमण !
२ मासांपूर्वी सामाजिक माध्यमांतून कथित आक्षेपार्ह टीपणी केल्याचे प्रकरण
डेहराडून (उत्तराखंड) – येथील पटेलनगरात २ मासांपूर्वी सामाजिक माध्यमांतून आक्षेपार्ह टीपणी केल्यावरून १० ते १२ मुसलमान तरुणांनी एका हिंदु विद्यार्थ्यावर लोखंडी सळ्या आणि तलवार यांद्वारे आक्रमण केले. यात हा विद्यार्थी गंभीररित्या घायाळ झाला असून त्याला रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. अमन भंडारी असे या विद्यार्थ्याचे नाव आहे.
देहरादून में कॉलेज जा रहे एक युवक पर दबंगों ने धारदार हथियार से किया हमला#Dehradun #crimehttps://t.co/AXWGNUocPx
— AajTak (@aajtak) July 28, 2023
या मारहाणीची माहिती मिळताच महाविद्यालयाबाहेर विद्यार्थ्यांकडून निदर्शने करण्यात आली. आक्रमक मुसलमानांपैकी एकाची दुचाकी घटनास्थळी दिसल्यावर त्याला आग लावण्यात आली. येथे तणाव निर्माण झाल्याने पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रणाच्या आधारे ४ जणांना कह्यात घेतले आहे. यात एक आरोपी आणि अन्य आरोपींचे कुटुंबीय आहेत.
संपादकीय भूमिकाउत्तराखंडमध्ये मुसलमानांची संख्या अन्य राज्यांच्या तुलनेत अल्प असतांनाही ते हिंदूंसाठी धोकादायक ठरत आहेत, असेच चित्र सध्या दिसत आहे. राज्यात भाजपचे सरकार असतांना अशी स्थिती येऊ नये, असे हिंदूंना वाटते ! |