कुख्यात नक्षलवादी ‘बिटलू’चे स्मारक तोडले !
गडचिरोली पोलिसांचे नक्षलवाद्यांना प्रत्युत्तर !
गडचिरोली – नक्षल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलिसांच्या एका तुकडीने कुख्यात नक्षलवादी ‘बिटलू’चे स्मारक तोडून नक्षलवाद्यांना प्रत्युत्तर दिले. हे स्मारक नक्षलवाद्यांनीच बांधले होते. काही मासांपूर्वी एका चकमकीत पोलिसांनी ‘बिटलू’ला ठार केले होते. त्याची दक्षिण गडचिरोलीत मोठ्या प्रमाणात दहशत होती.
नक्षलवादी ‘बिटलू’चे स्मारक तोडून गडचिरोली पोलिसांचे नक्षल सप्ताहाला प्रत्युत्तर; जवानांनी…#nagpur https://t.co/N6NI1XE37H
— LoksattaLive (@LoksattaLive) July 29, 2023
विविध कारणांनी मृत्यूमुखी पडलेल्या नक्षलवाद्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ प्रतीवर्षी २८ जुलै ते ३ ऑगस्ट या कालावधीत नक्षलवाद्यांकडून सर्वत्र ‘शहीद सप्ताह’ पाळला जातो. या कालावधीत हिंसक कारवाया घडवून आणण्यासह मृत नक्षलवाद्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ शहीद स्मारके बांधणे, पत्रकांच्या माध्यमातून नागरिकांना सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आवाहन करणे असे प्रकार केले जातात. नक्षलवाद्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद न देता सर्वकाही सुरळीत रहावे, यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत.