महाविद्यालयाचे व्यवस्थापक अब्दुल खादर यांनी संपूर्ण प्रकाराला ‘प्रँक’ संबोधून दुर्लक्ष करण्यास सांगितले !
उडुपी (कर्नाटक) येथील महाविद्यालयात धर्मांध विद्यार्थिनींनी प्रसाधनगृहात हिंदु विद्यार्थिनींचे अश्लील व्हिडिओ बनवल्याचे प्रकरण !
(प्रँक म्हणजे गंमत म्हणून चालाखीने बनवलेला व्हिडिओ)
उडुपी (कर्नाटक) – येथील ‘नेत्र ज्योती महाविद्यालया’तील हिंदु विद्यार्थिनींचे अश्लील व्हिडिओ बनवण्याचे आणि मुसलमान मुलांमध्ये ते प्रसारित करण्याचा प्रकार गेल्या वर्षभरापासून चालू असल्याची माहिती तेथील विद्यार्थिनींनी प्रसारमाध्यमांना दिली. महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी सांगितले की, शाफिया, अल्फिया आणि शबनाज या मुसलमान विद्यार्थिनी हिंदु विद्यार्थिनींचे व्हिडिओ बनवत असत. जेवणाच्या सुट्टीच्या वेळेत उच्चीला या गावातून येणार्या तीन मुसलमान मुलांना मुसलमान विद्यार्थिनी त्यांचा भ्रमणभाष देत असत. महाविद्यालय प्रशासनाकडे यासंदर्भात तक्रार करण्यात आली होती; परंतु प्रशासनाने यावर काहीही कारवाई केली नाही. २० जुलैला हिंदु मुलींनी ‘धरणे आंदोलन’ केले.
या वेळी हिंदु विद्यार्थिनींनी अब्दुल खादेर या महाविद्यालयाचे व्यवस्थापकांवरही गंभीर आरोप केला. त्या म्हणाल्या की, या प्रकाराविषयी खादेर म्हणाले की, मी त्यांच्याकडून ‘अशी चूक यापुढे करणार नाही’, असे ५ वेळा लिहून घेतले आहे, तसेच याकडे दुर्लक्ष करा; कारण हा केवळ एक ‘प्रँक’चा प्रकार आहे.
संपादकीय भूमिका
|