उडुपी येथील प्रकरणात मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांची सून अथवा पत्नी असती, तर…? असा प्रश्न विचारणार्या भाजपच्या महिला नेत्याला अटक !
हिंदु विद्यार्थिनींचे अश्लील व्हिडिओ बनवणार्या शैफा, शबानाझ आणि आलिया यांना जामीन !
उडुपी (कर्नाटक) – कर्नाटक पोलिसांनी बेंगळुरू येथून शकुंतला नावाच्या भाजपच्या महिला नेत्याला अटक केली आहे. २५ जुलै या दिवशी कर्नाटक काँग्रेसने त्यांच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून भाजपवर आरोप करत म्हटले होते की, उडुपी प्रकरणावर भाजप मीठ चोळण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच उडुपीचे प्रकरण हे ‘बनावट’ आहे. यावर भाजपच्या महिला नेत्या शकुंतला यांनी ट्वीट करत म्हटले होते की, काँग्रेसनुसार मुसलमान विद्यार्थिनींनी शौचालयात हिंदु विद्यार्थिनींचे व्हिडिओ बनवणे लहान मुलांचा खेळ आहे. मुख्यमंत्री सिद्धारामय्या आणि त्यांचा पक्ष यांनी त्यांची सून अन् पत्नी यांच्यासोबतही असाच प्रकार घडला असता, तर अशा स्वरूपाचीच प्रतिक्रिया दिली असती का ?
शकुंतला यांच्या या ट्वीटवरून बेंगळुरू येथील काँग्रेसचे नेते हनुमानथार्या यांनी पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली. यानंतर पोलिसांनी शुकंतला यांना अटक केली. कालांतराने त्यांना जामिनावर मुक्त करण्यात आले.
संपादकीय भूमिका
|