मणीपूरमध्ये सुरक्षा दलाशी चकमक : ५ आक्रमणकर्ते ठार
इंफाळ (मणीपूर) – मणीपूरमध्ये गेल्या २४ घंट्यांत विष्णुपूर आणि चुराचांदपूर जिल्ह्यांमध्ये हिंसाचार करणार्यांनी सुरक्षादलांवर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. या वेळी दोघांमध्ये चकमक झाली. हिंसाचार करणार्यांनी २०० गावठी बाँब आणि ड्रोन यांचा वापर केला. विष्णुपूर जिल्ह्याच्या फोउगावक्वाओ येथील ४ वेगवेगळ्या ठिकाणी सुरक्षा दल आणि आक्रमणकर्ते यांच्यात चकमक झाली. या चकमकीत ५ आक्रमणकर्ते ठार झाले, तसेच १ सैनिक, १ पोलीस, तर ३ नागरिक घायाळ झाले.