कोथरूडमध्ये अटक केलेल्या आतंकवाद्यांना पुण्यात आश्रय देणार्यास ए.टी.एस्.कडून अटक !
पुणे – कोथरूड येथे पकडलेल्या महंमद युनूस महंमद याकूब साकी आणि महंमद इम्रान महंमद युसूफ खान या आतंकवाद्यांना रहाण्यासाठी जागा देणार्या कोंढव्यातील अब्दुल कादीर दस्तगीर पठाण याला राज्य आतंकवादविरोधी पथकाने (ए.टी.एस्.ने) २६ जुलै या दिवशी अटक केली आहे. हे आतंकवादी दीड वर्षांपासून कोंढवा परिसरातील मीठानगर येथील ‘चेतना गार्डन’ या इमारतीत रहात होते. दोघांच्या आतंकवादी कारवायांची माहिती असतांनाही पठाणने त्यांना रहायला खोली दिल्यामुळे त्याला अटक केली आहे.
छोट्याशा खोलीत रहाणारा पठाण दोघांना पैसे कसे देत होता ? या आतंकवाद्यांना कोणत्या संघटना आणि संस्था साहाय्य करत होत्या ? याचे अन्वेषण चालू आहे, असे ए.टी.एस्.चे साहाय्यक पोलीस आयुक्त अरुण वायकर यांनी सांगितले. (आतंकवादी कारवाया करत आहेत, हे ठाऊक असूनही त्यांना आश्रय देणार्यांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा नोंद करायला हवा ! – संपादक)
अन्वेषणात उघडकीस झालेली माहिती१. राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने गुन्हा नोंद केल्यानंतर साकी आणि खान मार्च २०२२ मध्ये मुंबईतील भेंडी बाजार येथे आले होते. पकडले जाण्याच्या भीतीने ते पुण्यात आले आणि कोंढव्यातील कौसरबाग येथील एका मशिदीत रहात होते. (जिहादी आतंकवादी हे मशिदीत लपून बसल्याचे अनेक वेळा समोर आले आहे. मशिदीत अनेक अवैध कृत्ये होत असल्याचेही वारंवार समोर येते. असे असूनही सरकार भारतभरातील मशिदींना टाळे का ठोकत नाही ? असा प्रश्न राष्ट्रप्रेमींना पडला आहे ! – संपादक) २. त्यांची ओळख दस्तगीर पठाणशी झाल्यानंतर, ‘आम्ही गरीब असून कामाच्या शोधात आलो आहोत,’ असे त्यांनी पठाणला सांगितले. ‘ग्राफिक्स डिझाईन’चा व्यवसाय करणार्या पठाणने या दोघांना ‘ग्राफिक्स डिझाईन’चे काम देऊन दोघांना प्रतिमास ८ सहस्र रुपये वेतन देत असे. ३. पठाण याने ‘चेतना गार्डन’मधील अन्वर अली इद्रिस यांच्या मालकीची खोली भाड्याने घेऊन त्यांना रहायला दिली. या खोलीचे साडेतीन सहस्र रुपये भाडे तो या दोघांकडून घेत होता. |
संपादकीय भूमिकाअशांना त्वरित कठोर शिक्षा दिल्यासच अन्य कुणी आतंकवाद्यांना आश्रय देण्याचे धाडस करणार नाहीत ! |