घराचे ‘गुरुमंदिर’ असे नामकरण केल्यावर सोजत रोड (राजस्थान) येथील श्रीमती अर्चना लढ्ढा यांना आलेल्या अनुभूती !
‘आम्ही ६४ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. आनंद जाखोटिया (राज्य समन्वयक, मध्यप्रदेश आणि राजस्थान, हिंदु जनजागृती समिती) यांना विचारले, ‘‘आमच्या घराला काय नाव देऊ ?’’ तेव्हा त्यांनी त्याविषयी सद़्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांना विचारले आणि ‘घराला ‘गुरुमंदिर’, असे नाव देऊ शकता’, असा सद़्गुरु पिंगळेकाकांचा निरोप आम्हाला दिला. त्यानुसार आम्ही आमच्या घराचे ‘गुरुमंदिर’, असे नामकरण केले. त्यानंतर मला आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
१. घराचे नामकरण ‘गुरुमंदिर’, असे केल्यावर ‘आता सर्वकाही परात्पर गुरु डॉ. आठवले यांचेच झाले आहे. आता मला कसलीच चिंंता उरली नाही. गुरुदेवांनी मला आपल्या हृदयमंदिरात स्थान दिले आहे’, असे मला वाटते.
२. मला वास्तूमधील चैतन्यात पुष्कळच वाढ झाल्याचे जाणवतेे.
३. आता मला घरात सूक्ष्मातून फिरणार्या अनिष्ट शक्ती जाणवत नाहीत.
४. ‘मी गुरुदेवांच्या हृदयात रहात आहे. मी मंदिरात, म्हणजे गुरुचरणीच रहात आहे’, असे मला वाटू लागले. माझ्याकडून भावजागृतीचे प्रयत्न अधिक प्रमाणात होऊ लागले. त्यामुळे संपूर्ण वास्तूत ‘भाव तेथे गुरुदेव !’, असे मला जाणवू लागले.
५. घराचे नामकरण झाल्यानंतर काही दिवसांतच घरी एक समारंभ होता. तेव्हा २ दिवस सर्व कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्र आमच्या घरी रहायला आले होते. जेव्हा ते जायला निघाले, तेव्हा त्या सर्वांनी सांगितले, ‘‘तुमचे घर सोडून जाऊच नये’, असे आम्हाला वाटते. तुमच्या घरात पुष्कळ शांती जाणवते. ‘लवकरच तुमच्या घरी पुन्हा यावे’, असे वाटते.’’
– श्रीमती अर्चना लढ्ढा, सोजत रोड, राजस्थान. (१९.३.२०२३)
जमावबंदी असूनही गुरुकृपेने हिंदु राष्ट्र-जागृती सभेला अनुमती मिळणे
‘एप्रिल २०२२ मध्ये सोजत रोड (राजस्थान) येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा घेण्याचे ठरले होते; परंतु संपूर्ण राजस्थानमध्ये ‘कलम १४४’ (जमावबंदी) लागू केले होते. त्यामुळे सभेला अनुमती मिळणे अशक्यच होते, तरीही आम्ही प्रयत्न केले आणि गुरुदेवांच्या कृपेने आम्हाला सभा घेण्याची अनुमती मिळाली. प्रशासकीय अधिकारी म्हणालेे, ‘‘आम्ही अनुमती देणार नाही.’’ त्या वेळी मी स्थानदेवता, ग्रामदेवता आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांना अनन्यभावाने शरण जाऊन ‘समष्टीसाठी आवश्यकता असेल, तर आपणच ही सभा होऊ द्या’, अशी प्रार्थना केली. शेवटी गुरुकृपेने सभेला अनुमती मिळाली. सभेची सेवा करतांना ‘मला पुष्कळ बळ मिळत आहे. ‘ही सेवा मी करत नसून सर्वकाही आपोआप होत आहे. मी एखाद्या कठपुतलीसारखे पहात आहे’, असे मला जाणवत होते.’
– श्रीमती अर्चना लढ्ढा, सोजत रोड, राजस्थान. (१९.३.२०२३)
|