भाजपचे खासदार सुनीलकुमार सिंह लोकसभेत समान नागरी कायद्यासाठी प्रस्ताव मांडणार
नवी देहली – भाजपचे झारखंडमधील खासदार सुनीलकुमार सिंह देशात समान नागरी कायदा करण्यासाठी लोकसभेत प्रस्ताव सादर करणार आहेत. ‘समान नागरी कायदा हा सर्व नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे. या कायद्यामुळे लोकांना समानतेचा अधिकार मिळणार आहे. धर्म, जात, लिंग आदींद्वारे भेदभावाला सामोरे जावे लागणार नाही. सध्या देशात महिलांच्या अधिकारांचे उल्लंघन होत आहे’, असे या प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.
संपादकीय भूमिका :मनमानीपणा आणि सरकारी सुविधा बंद होण्याच्या भीतीने अल्पसंख्यांकांकडून समान नागरी कायद्याला विरोध होतो, हे जाणा ! |