‘अजमेर कांड’ चित्रपट प्रदर्शित करू न दिल्यास ‘यू ट्यूब’वर प्रदर्शित करू ! – सचिन कदम, दिग्दर्शक
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष संवाद : ‘अजमेर बलात्कार कांड : मुसलमान लांगूलचालनाचा परिणाम ?’
मुंबई – चिश्तीचे वंशज आणि युथ काँग्रेसचे नेते फारूक, नफिस अन् अन्वर चिश्ती यांनी अजमेर बलात्कार कांड घडवून आणले. याविषयी ‘अजमेर कांड’ हा चित्रपट आम्ही सप्टेंबर २०२३ मध्ये प्रदर्शित करण्याचा प्रयत्न करत आहोत. केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळ (सेन्सॉर बोर्ड) या चित्रपटाचे भित्तीपत्रक, फलक (बॅनर) आणि संवाद यांवर आक्षेप घेत आहे. माझ्या चित्रपटातील कलाकार आणि मला धमक्या सुद्धा दिल्या जात आहेत. सत्य घटना सांगायला विरोध का केला जात आहे ? यामध्ये ‘निधर्मी’ (सेक्युलर) हिंदूच आम्हाला विरोध करत आहेत. ‘अजमेर बलात्कार कांडा’विषयी चित्रपट आम्हाला प्रदर्शित करू दिला नाही, तर ‘यू ट्यूब’वर आम्ही तो प्रदर्शित करू, अशी चेतावणी ‘अजमेर कांड’ या चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक श्री. सचिन कदम यांनी दिली आहे. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘अजमेर बलात्कार कांड : मुसलमान लांगूलचालनाचा परिणाम ?’, या विषयावर आयोजित केलेल्या ऑनलाईन विशेष संवादात ते बोलत होते.
आजही अनेक ठिकाणी छोट्या स्वरूपात ‘अजमेर बलात्कार कांड’ होत आहे ! – अधिवक्त्या मणी मित्तल, सर्वोच्च न्यायालय, देहली
‘अजमेर बलात्कार कांड’ प्रकरणात किती हिंदु युवतींवर सामूहिक बलात्कार झाले, याची १००, २०० किंवा २५० अशी विशिष्ट संख्या सांगणेही कठीण आहे. अत्याचार झाल्यावर या अल्पवयीन मुलींची छायाचित्रे काढून त्यांना ‘ब्लॅकमेल’ करण्यात आले. यानंतर अनेक मुलींनी आत्महत्या केल्या. बलात्कारासारख्या संवेदनशील प्रकरणात पोलिसांची भूमिका ही सकारात्मक असते; मात्र या प्रकरणात पोलिसांची भूमिका ही नकारात्मक राहिलेली आहे. ‘द कश्मीर फाइल्स’, ‘द केरल स्टोरी’ यांसारख्या चित्रपटांनंतर आता ‘अजमेर ९२’ चित्रपट प्रदर्शित होत आहे. त्या वेळी अजमेर बलात्कार कांड मोठ्या स्वरूपात झाले; मात्र आजही अनेक ठिकाणी छोट्या स्वरूपात हे होत आहे. आज हिंदूंनी पाश्चात्त्य विकृतीचे अंधानुकरण न करता जागृत राहून मुला-मुलींमध्ये जनजागृती केली पाहिजे.
‘अजमेर ९२’ चित्रपट आल्यावर हिंदु मुलींवर कसे अत्याचार झाले ? हे येणार्या पिढीलाही कळेल ! – विजय सिंह, संपादक, ‘सद़्गुरु’ वृत्तपत्र आणि वेब पोर्टल
अजमेर बलात्कार कांडमध्ये २०० हून अधिक हिंदु युवतींवर अत्याचार झाल्यावरही अनेक आरोपींना निर्दोष सोडण्यात आले. याविषयी अंतिम काय घडले ? हे त्या वेळी कळले नाही आणि आजही जनतेला नीट कळलेले नाही. त्या वेळी मर्यादित असलेल्या वर्तमानपत्रांनी याविषयीच्या बातम्या छापल्या; म्हणून हा विषय उजेडात आला. ‘अजमेर ९२’ हा चित्रपट आल्यावर हिंदु मुलींवर कसे अत्याचार झाले ? हे येणार्या पिढीलाही कळेल. अजमेर दर्ग्यात आज अनेक हिंदू श्रद्धेने जात आहेत. आता हिंदूंनीच ठरवायचे आहे कि काय करायचे ?