महिलांच्या विरोधातील गुन्ह्यांवर सहनशीलता बाळगणार नाही ! – केंद्रशासनाचे सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र मणीपूरचे प्रकरण केंद्रीय अन्वेषण विभागाकडे सोपवले !
मणीपूर येथील दोन महिलांना विवस्त्र करून धिंड काढल्याचे प्रकरण
नवी देहली – मणीपूर येथे दोन महिलांना विवस्त्र करून त्यांची धिंड काढल्याच्या प्रकरणी केंद्रशासनाने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले. शासनाने म्हटले की, महिलांच्या विरोधातील गुन्ह्यांसंदर्भात कोणतीच सहनशीलता न बाळगण्याचे आमचे धोरण आहे.
मणिपुर: भीड़ द्वारा महिलाओं को नग्न घुमाने की घटना की सीबीआई करेगी जांच#Manipur #ManipurViolence #ManipurViralVideo #CBI #WomenParadedNaked #मणिपुर #मणिपुरहिंसा #सीबीआईhttps://t.co/YgM7VI1q9D
— द वायर हिंदी (@thewirehindi) July 28, 2023
या प्रकरणी ७ लोकांना अटक करण्यात आली असून हे प्रकरण केंद्रीय अन्वेषण विभागाकडे सोपवण्यात आले आहे. या प्रकरणाची सुनावणी मणीपूर राज्याच्या बाहेर करण्याची मागणीही केंद्रशासनाने या वेळी केली. केंद्रीय गृह मंत्रालयाने सांगितले की, हे प्रकरण समोर आल्यापासून या संबंधीच्या प्रत्येक घटनाक्रमाकडे आमचे लक्ष आहे. आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांची अनेक पथके तैनात करण्यात आली आहेत. अतिरिक्त पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकार्याकडे या घटनेचे अन्वेषण करण्याचे दायित्व सोपवण्यात आले आहे.
संपादकीय भूमिका :लव्ह जिहादमध्ये अडकलेल्या सहस्रावधी हिंदु मुलींसंदर्भातही सरकारी यंत्रणांकडून अशी भूमिका कधी घेतली जाणार ? |