लोणी काळभोर (पुणे) येथे भरदिवसा किरकोळ कारणावरून ४ धर्मांधांकडून विद्यार्थ्यांना मारहाण !
लोणी काळभोर (जिल्हा पुणे ) – कदमवाकवस्ती येथील एम्.आय.टी. कॉर्नरजवळ २६ जुलै या दिवशी किरकोळ कारणावरून सराईत गांजा तस्कर मंटा आणि त्याच्या ४ मुसलमान साथीदारांनी २ विद्यार्थ्यांना मारहाण केली आहे. चिन्मय साडविलकर आणि ऋषभ सातव अशी मारहाण झालेल्या विद्यार्थ्यांची नावे असून ऋषभ सातव यांनी या प्रकरणी तक्रार प्रविष्ट केली आहे. पोलिसांनी आरोपींवर अदखलपात्र गुन्हा नोंद केला आहे. लोणी काळभोर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर भरदिवसा ही घटना घडल्यामुळे पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक राहिला नसल्याच्या संतापजनक प्रतिक्रिया स्थानिकांनी व्यक्त केल्या आहेत.
परिसरातील नागरिकांकडून मिळालेली माहिती
१. कदमवाकवस्ती ग्रामपंचायत परिसरातील महाविद्यालयाकडे जाणार्या रेल्वे रुळावर साखळी चोरीसाठी प्रसिद्ध असलेल्या गुन्हेगारी प्रवृत्तीचे काही तरुण गांजा पीत बसले होते. या वेळी महाविद्यालयातील २ विद्यार्थी सेवा रस्त्याने निघाले होते. त्यांतील एकाचा पाय घसरला. आधारासाठी त्याने शेजारील दुचाकीला पकडले. या वेळी दुचाकीला धक्का लागल्याने दुचाकी पडली. त्यामुळे ४ ते ५ जणांनी गाडी पडल्याच्या कारणावरून दोघांना जबर मारहाण करणे चालू केले.
२. या वेळी कर्तव्यावर असलेल्या वाहतूक शाखेच्या पोलिसांनी भांडणामध्ये मध्यस्ती करून भांडणे मिटवण्याचा प्रयत्न केला. त्यांनाही आरोपींनी धक्काबुक्की केली.
३. चारही तरुण हे कदमवाकवस्ती परिसरातील इराणी वस्तीत रहातात. लोणी काळभोरसह पुणे शहरातही ते साखळी चोरीसाठी प्रसिद्ध आहेत. चौघांवर साखळीचोरीचे अनेक गुन्हे लोणी काळभोर, हडसपरसह पुण्यातील विविध पोलीस ठाण्यांत प्रविष्ट आहेत.
४. इराणी वस्तीमध्ये मोठ्या संख्येने मुसलमानांची वस्ती आहे. या भागात गांजा तस्करी, सेक्स रॅकेट मोठ्या प्रमाणावर चालू आहे. हिंदु मुलींना हेरायचे आणि त्यांना लव्ह जिहादची शिकार बनवायची. किरकोळ कारणावरून त्या भागात दहशत निर्माण करायची, असे अवैध प्रकार या ठिकाणी चालू आहेत.
संपादकीय भूमिकाहिंदूंनो, धर्मांधांच्या रस्त्यावरील उद्दामपणाला तोंड देण्यासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या आणि संघटित व्हा ! |