मैतेई समाजातील लोकांच्या घरांना ख्रिस्ती कुकी आतंकवाद्यांनी लावली आग !
आग विझवण्यासाठी गेलेल्या सैनिकांना कुकी महिलांनी केला विरोध !
इंफाळ (मणीपूर) – मणीपूर येथे कुकी आणि मैतेई समाजातील लोकांमध्ये चालू असलेल्या हिंसाचाराच्या संदर्भात प्रतिदिन नवीन घटना समोर येत आहेत. येथे २७ जुलै या दिवशी कुकी आतंकवाद्यांनी मैतेई समाजातील लोकांच्या घरांना आग लावल्यानंतर ती विझवण्यासाठी तेथे जाण्याचा प्रयत्न करणार्या सुरक्षायंत्रणांच्या सैनिकांना कुकी महिला विरोध करत असल्याचा एक व्हिडिओ प्रसारित झाला आहे. हा व्हिडिओ राज्यातील मोरेह गावातील असून कुकी आतंकवाद्यांच्या आक्रमणामुळे आधीच शहर सोडलेल्या मैतेई लोकांच्या घरांना आग लावण्यात आली आहे. हा व्हिडिओ ‘मैतेई हेरिटेज सोसायटी’ या ट्विटर खात्यावरून ट्वीट करण्यात आला आहे.
२७ जुलैच्या सायंकाळी संरक्षण यंत्रणा आणि म्यानमारमधून आलेले आतंकवादी यांच्यामध्ये गोळीबार झाल्याचे सांगण्यात येत आहे. या ट्वीटमध्ये पुढे माहिती देण्यात आली आहे की, १९९० च्या दशकामध्ये मोरेह या गावातील नागा लोकांनाही कुकी आतंकवाद्यांनी पळवून लावले होते.
संपादकीय भूमिका :
|