बेगूसराय (बिहार) येथे १० वर्षीय मुलीवर बलात्कार करून हत्या !
|
बेगूसराय (बिहार) – येथे एका १० वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. तिच्या घराशेजारी रहाणार्या व्यक्तीनेच हे कृत्य केले असून हत्या केल्यानंतर तिने मृतदेह घराखालीच पुरला. मुलगी २४ जुलैपासून गायब असल्याने कुटुंबियांनी पोलिसात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी मुलीचा मृतदेह हस्तगत केला. विशेष म्हणजे आरोपीला अटक करून सोडून देण्यात आले होते. प्रकरणाची व्याप्ती वाढून जनतेचा विरोध होऊ लागल्यानंतर त्याला पुन्हा अटक करण्यात आली.
Bihar: 10-year-old girl raped and murdered by neighbour in Begusarai, buried in his basementhttps://t.co/PQLyafL31c
— OpIndia.com (@OpIndia_com) July 28, 2023
बिहार राज्याला नितीश कुमार सरकारने नरक करून टाकले ! – भाजपया घटनेवर केंद्रीय मंत्री आणि स्थानिक खासदार गिरिराज सिंह यांनी बिहार सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले की, बिहार राज्याला नितीश कुमार सरकारने नरक बनवले आहे. येथे सध्या मोठ्या प्रमाणात गुन्हे घडत आहेत. दरभंगा येथे एका दलित हिंदूच्या मृतदेहावर लघवी करण्याची घटना समोर आली. पूर्णिया येथे भाजपच्या नेत्याची चाकू भोसकून हत्या करण्यात आली. बेगूसरायमध्ये एका अल्पवयीन दलित हिंदु मुलीला निर्वस्त्र करून तिला मारहाण करण्यात आली. |
संपादकीय भूमिकाइतके गंभीर आरोप असतांना बिहार पोलीस आरोपीला सोडतेच कसे ? संबंधित पोलीस अधिकार्यांवर कठोर कारवाई व्हायला हवी ! |