कर्जत येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे काम चालू करू ! – उदय सामंत, उद्येागमंत्री
मुंबई, २८ जुलै (वार्ता.) – आहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड औद्योगिक वसाहतीची अधिसूचना वर्ष १९९६ मध्ये झाली. तेव्हापासून आजपर्यंत त्यावर कोणताही उद्योग उभारला गेला नाही, हे खरे आहे; परंतु त्याविषयी लवकरच प्रयत्न चालू करू. कर्जत येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एम्.आय.डी.सी.) जागेची पाहणी करून त्याचेही काम चालू करू, असे आश्वासन उद्योगमंत्री उदय सांमत यांनी २७ जुलै या दिवशी विधान परिषदेत दिले. विधान परिषदेचे सदस्य राम शिंदे यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता.
सामंत पुढे म्हणाले की, कर्जत किंवा जामखेड येथील भूमी कुणी कुणी खरेदी केल्या आहेत, ते पडताळून पहाण्यात येईल. त्यात अनेक धक्कादायक नावे समोर येत आहेत. त्याची शहानिशा केली जाईल. खर्या शेतकर्यांना त्याचा लाभ कसा होईल ?, याचा प्रयत्न करू. जलसंपदा मंडळाने अजून पाण्याचे प्रमाण घोषित केले नाही. तांत्रिक गोष्टी पडताळून लवकरच अनुमती देऊ.