ठाणे जिल्ह्याला पावसाने झोडपले !
बारवी धरण भरत आले !
ठाणे, २८ जुलै (वार्ता.) – मुसळधार पडत असलेल्या पावसांमुळे २७ जुलै या दिवशी ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, भिवंडी आणि ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले होते. कल्याण येथे रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने रेल्वे सेवा धीम्या गतीने चालू होती. उल्हास आणि काळू नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने नदी काठच्या गावांना सतर्कतेची चेतावणी देण्यात आली होती.
ठाणे शहरात संततधार पाऊस पडत असून शहरातील घोडबंदर रस्त्यावर असं ठिकठिकाणी पाणी साचलं आहे. परिणामी रसत्यावरची वाहतूक बंद आहे. (व्हिडिओः प्रफुल्ल गांगुर्डे, ठाणे) #MumbaiRains #thanenews pic.twitter.com/ukl3JPQWnd
— Hindustan Times Marathi (@htmarathi) July 27, 2023
पावसामुळे ठाणे येथे अपघाताच्या ३ घटना घडल्या आहेत. या ३ घटनांमध्ये एकाच रस्ते अपघातात मृत्यू झाला असून २ जण वाहून घेल्याची घटना घडली आहे.
ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, भिवंडी भागांतील सखल भागांत पाणी साचले.
ठाणे येथील वंदना चित्रपटगृहाचा परिसर, घोडबंदर रस्त्यावरील मानपाडा, आनंदनगर, ओवळा या ठिकाणी पावसाचे पाणी साचले होत. मुंब्रा बायपास रस्त्यावरील डोंगराचा काही भाग कोसळला, त्यामुळे येथील ४५ कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आले आहे. या घटनेत कुठलीही दुखापत किंवा जीवितहानी झालेली नसली, तरी घटनास्थळी वन विभाग कर्मचारी, एन्.डी.आर्.एफ्. पथक, आपत्ती व्यवस्थापन पथक, अग्नीशमन दल, स्थानिक पोलीस कर्मचारी दाखल झाले आहेत. कल्याण पश्चिमेकडे छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड परिसरात पाणी साचले आहे. त्यामुळे वाहनचालकांना आणि नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत होती.
News Update : बारवी धरणाची आजची पाणी पातळी ही 70.74 मीटर असून ओव्हरफ्लो होण्याची लेव्हल 72.60 मीटर आहे. अजून धरण ओव्हरफ्लो झालं नाही.
धरणाचे दरवाजे स्वयंचलित असून पाणी पातळी वाढली की धरणाचे दरवाजे आपोआप उघडले जातात. धरणाचे दरवाजे उघडण्यासाठी अद्याप 6 फूट पाणी वाढणे गरजेचे आहे. pic.twitter.com/sNEfUykoL8
— Maharashtra Majha News (@MahaMajhaNews) July 27, 2023
बारवी धरणक्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून संततधार पाऊस पडतो आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांत बारवी धरण वेगाने भरते आहे. बारवी धरणाची उंची ७२.६० मीटर इतकी आहे. बारवी धरणाला ११ स्वयंचलित दरवाजे आहेत. ज्या वेळी ७२.६० मीटर पेक्षा अधिकचे पाणी धरणात जमा होते, त्या वेळी स्वयंचलित दरवाजे सक्रिय होऊन अतिरिक्त पाणी सोडले जाते. त्यानंतर ७२.६० मीटर पेक्षा पाणीपातळी न्यून झाल्यास हे दरवाजे स्वयंचलित पद्धतीने बंद होतात. २७ जुलै या दिवशी सकाळी बारवी धरणाने ७०.६४ मीटरची पाणी पातळी गाठली होती. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेची चेतावणी देण्यात आली आहे.