गरीब हिंदूंना आमीष दाखवून त्यांचे धर्मांतर करणार्या पाद्रयाला अटक !
|
गाझियाबाद (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेश पोलिसांनी येथे धाड टाकून धर्मांतर करून पाद्री झालेल्या महिंदर कुमार याला अटक केली. तो गरीब हिंदूंना आमीष दाखवून त्यांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करत होता. पोलीस याचे अन्वेषण करत आहेत.
पोलीस अधीक्षक ज्ञान प्रकाश यांनी सांगितले की, आशिष नावाच्या व्यक्तीच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली आहे. महिंदर कुमार आणि त्याची पत्नी पूर्वी हिंदु होते आणि ख्रिस्ती मिशनर्यांच्या आमिषांना बळी पडून ते ख्रिस्ती बनले. नंतर या दांपत्याने ‘बेथलेहम गॉस्पेल’ नावाचा न्यास स्थापन केला. या न्यासाला विदेशातून पैसे येऊ लागले. याचा वापर गरीब हिंदूंचे धर्मांतर करण्यासाठी होऊ लागला होता. त्यांनी मोदीनगरच्या वेगवेगळ्या गावांमध्ये हस्तक निर्माण केले होते. गरीब आणि दलित हिंदूंना सनातन धर्माच्या विरोधात चिथावणी देऊन त्यांना ख्रिस्ती बनण्यास उद्युक्त करणे, असे या हस्तकांचे काम होते. जेव्हा हे लोक धर्मांतरासाठी सिद्ध होत असत, तेव्हा हे हस्तक याची माहिती महिंदर कुमार याला देत. तो प्रत्येक रविवारी या हस्तकांना भेटण्यासाठी या गावांमध्ये जात होता. तेथे जाऊन तो पैसे देऊन लोकांचे धर्मांतर करत होता. या प्रकरणी त्याच्या अन्य साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे.
संपादकीय भूमिका
|