कारगिल विजय दिनानिमित्त त्रिशूल युद्ध स्मारकासाठी ३ कोटींचा निधी सुपुर्द !
मुंबई, २७ जुलै (वार्ता.) – कारगिल विजय दिनानिमित्त लडाख येथील त्रिशूल युद्ध स्मारकाच्या दर्जा उन्नतीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ३ कोटी रुपयांचा निधी सुपुर्द करण्यात आला.